Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनुका खा, सिंहकटी मिळवा

मनुका खा, सिंहकटी मिळवा
लंडनमधील आहार तज्ज्ञांना असे आढळून आले आहे की, खाण्यामध्ये मनुकाचा वापर वाढवला की, पोटाचा घेर कमी होतो. मात्र अशा व्यक्तीला मनुकाची आवड असली पाहिजे. या शास्त्रज्ञांना असेही आढळून आले आहे की, डाएटिंग नंतर लगेच पूर्वस्थिती येते ती टाळण्यासाठी मनुका उपयुक्त ठरतात. डाएटिंग करताना खूपदा भूक लागते आणि खाण्यावर तर बंधने असतात. अशावेळी मनुका खाव्यात. बारा आठवडय़ाच्या एका कार्यक्रमात 100 लठ्ठ व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आले. त्यातल्या एका गटाला मनुका खाण्यास आवर्जून देण्यात आल्या तेव्हा त्यांचे वजन मनुका न दिलेल्या गटापेक्षा कमी झाले आणि त्यांच्या कमरेचा घेरसुद्धा अधिक एक इंचाने कमी झाला.

डाएटिंगमध्ये काजू वगळता बदाम, पिस्ता आणि मनुका आवर्जून खाव्यात असे या तज्ज्ञांचे मत आहे. आहारावर नियंत्रण ठेवून वजन कमी करणे आणि एकूणच सडपातळ होणे या दोन गोष्टी सर्वस्वी भिन्न आहेत. सिंहकटी म्हणजे कमी रुंदीची कंबर हे सडपातळ   माणसाचे वैभव असते आणि ती गोष्ट मनुका खाल्ल्याने साध्य होते. जाड माणूस डाएटिंगने वजन कमी करतो, परंतु डाएटिंग संपताच त्याचे वजन पुन्हा पूर्ववत होते. ते होऊ नये आणि पुन्हा जाडी वाढू नये यासाठी मनुका खाणे आवश्यक आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi