Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उन्हाळ्यात पीत असाल कोल्ड्रिंक...तर जाणून घ्या 5 गंभीर नुकसान

उन्हाळ्यात पीत असाल कोल्ड्रिंक...तर जाणून घ्या 5 गंभीर नुकसान
बारा महिने सॉफ्ट सोडा कोल्ड्रिंक पिणार्‍यांची कमी नाही, तरी उन्हाळ्यात बहुतेक लोक गळ्याला तरतराटी येण्यासाठी कोल्ड्रिंकचे सेवन करतात. आपल्याला कोल्ड्रिंक्समुळे होणारे नुकसान माहीत असतील तरी कोल्ड्रिंकचे हे 5 गंभीर नुकसान जाणून घ्या आणि मग निर्णय घ्या की आरोग्यासाठी काय योग्य आहे ते:
 
1. एक केन किंवा बाटली कोल्ड्रिंक पिण्याने, सुरुवातीच्या 10 मिनिटातच आपण दिवसभरात उपभोग केली जाणारी साखरेची मात्रा ग्रहण करून घेतात. याने शरीरात शुगरचे स्तर अनावश्यकपणे वाढते.

2. कॅफीन आढळणारे कोल्ड्रिंक पिण्याने 20 मिनटानंतर आपल्या शरीरातील ब्लड शुगर लेवल वाढून इंसुलिनसह अत्यंत तीव्रतेने वरती येतं. याने शुगर आणि सोडियमची मात्रा वाढते ज्यामुळे आपल्या आरोग्यासंबंधी वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

3. कोल्ड्रिंक पिण्याने आपले यकृत ही शुगर चरबी म्हणून साठवून घेतो. ज्याने आपले वजन जलद गतीने वाढू लागतं आणि शरीरात अनावश्यक चरबी वाढते. याने आपण हृदय रोग, टाइप 2 मधुमेह आणि कर्करोग सारख्या रोगांच्या बळी जाऊ शकतात.
webdunia
4. कोल्ड्रिंक सेवन केल्याच्या 40 मिनिटात हे आपल्या पूर्ण शरीराद्वारे शोषले जातो. नंतर याने रक्तदाब वाढतं. एवढंच नव्हे तर 45 मिनिटानंतर हे डोपेमाइनचे निर्माण वाढवतो ज्याने आपल्या मेंदूवर परिणाम होतो. मेंदूवर याचा प्रभाव हेरॉईन सारखे धोकादायक ड्रग्जप्रमाणे होतो.

5. कॅफीन आढळणारे कोल्ड्रिंक पिण्याच्या 1 तासानंतर जेव्हा आपण मूत्र त्याग करता तेव्हा शरीराद्वारे आपल्या हाडांसाठी उपयोगी शरीरातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जस्त बाहेर निघून जातं जे धोकादायक आहे.
 
म्हणून हे अती शुगर आढळणारे आणि आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक कोल्ड्रिंक्सचे सेवन टाळावे. याऐवजी कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताज्या फळांचे रस, ताक, नारळ पाणी असे नैसर्गिक पेय प्यायला हवे. जे आरोग्यासाठी उत्तम असून इंस्टंट एनर्जी ‍देणारे आहेत.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi