Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उन्हाळ्यात रात्री चांगली झोप हवी असेल तर या पदार्थांचे सेवन करा

उन्हाळ्यात रात्री चांगली झोप हवी असेल तर या पदार्थांचे सेवन करा
अर्ध्याहून जास्त एप्रिलचा महिना गेला आहे आणि देशातील बर्‍याच भागांमध्ये प्रचंड गर्मी पडत आहे. 'लू' लागल्याने बर्‍याच लोकांना त्रास होत आहे. अशात योग्य आणि सुपाच्य भोजन करणे फारच आवश्यक आहे. गर्मीत रात्री जेवणाकडे जास्त लक्ष्य द्यायला पाहिजे ज्याने शरीरात कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेता येईल. गर्मीत डिनरमध्ये डोळे बंद करून असे काहीही खाऊ नका, बलकी असे भोजन करा ज्याने शरीरात तरलता येईल आणि रात्री गर्मीच्या प्रकोपाने तुम्हाला आराम मिळेल. बर्‍याच वेळा भारी भोजन केल्याने रात्रभर बेचैनी असते आणि झोप लागत नाही. आम्ही तुम्हाला असे काही जेवणाबद्दल सांगू ज्याने उन्हाळ्यात रात्री त्याचे सेवन केल्याने लाभ मिळतो. यांच्या सेवनामुळे शरीर दुर्बल होत नाही, तरलता कायम राहते. गर्मीत सेवन केले जाणारे आवश्यक फूड :

webdunia
1. दुधी : दुधीत बरेच गुण असतात, ही गर्मीत आराम देते. दुधीत भरपूर प्रमाणात पाणी असते जे शरीराला हायड्रेट बनवून ठेवतो आणि रात्री पाणी कमी प्यायल्याने डिहाईड्रेशन देखील होत नाही. जर तुम्हाला गर्मीत कुठलेही भोजन योग्य प्रकारे पचत नसेल तर दुधीचे सेवन उत्तम राहत. दुधीची भाजी, रायता आणि खिरीचे सेवन करावे.
webdunia
2. खीरा: खीर्‍यात भरपूर मात्रेत पाणी असत जे रात्रीच्या भोजनात घ्यायला पाहिजे. एका खिर्‍यात 96 टक्के भाग पाणी आणि 4 टक्के फायबर असत. हे पाचन क्रियेला दुरुस्त ठेवतो आणि बॉडीला डिहाईड्रेट होऊ देत नाही.  
 
webdunia
3. कोहळा : कोहळ्यात पोटॅशियम आणि फायबर प्रचुर मात्रेत असतात. यात असे गुण असतात जे शरीराला थंड बनवून ठेवतात. उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणात याचे सेवन केले पाहिजे. याच्या सेवनाने शरीरातील ब्‍लड शुगर लेवल देखील नियंत्रित बनून ठेवतो.   
webdunia
4. दोडके : बर्‍याच भागांमध्ये याला तुरई देखील म्हणतात. ही भाजी गर्मीत फार चांगली आहे. याचे सेवन केल्याने पाचन क्रिया दुरुस्त राहते आणि पचन संबंधी कुठलाही त्रास होत नाही.
webdunia
5. उकडलेले बटाटे : उन्हाळ्यात उकडलेले बटाटे किंवा भाजलेले बटाट्यांचे सेवन केले पाहिजे कारण यात कार्बोहाईड्रेट असत जे सुपाच्‍य असत आणि गर्मीपासून लढण्यासाठी योग्य असतो. याचे सेवन केल्याने झोप बाधित होत नाही.
webdunia
6. दही : दहीत उच्च मात्रेत पोषक तत्त्व असतात तसेच यात कॅल्शियम देखील असत. रात्री दहीचे सेवन केल्याने पोट दुरुस्त राहत आणि कुठल्याही प्रकारची समस्या राहत नाही. दहीचे सेवन केल्याने शरीराला थंडक मिळते.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi