Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओले मोज घालून झोपा

ओले मोज घालून झोपा
ओले मोज घालून झोपावं ऐकायला विचित्र असेल कदाचित पण याचे मोठ्या समस्या सुटतात. पाहू या काय फायदा आहे ओले मोज घालून झोपण्याचा:
* बर्‍याच दिवसापासून थोडा बहुत ताप येत जात असेल, कमजोरी वाटत असेल तर हा उपाय करून पहा. एका भांड्यात पाण्यात व्हिनेगर मिसळून त्यात मोजे बुडवा. हे ओले मोजे घालून झोपा याने शरीराचं तापमान सामान्य होण्यास मदत होईल.

* छातीस जळजळ होत असल्यास किंवा घशात कफ असेल तर एका भांड्यात दोन कप दूध, एक चमचा मध आणि दोन चिरलेले कांदे मिसळा. पंधरा मिनिटांनंतर त्यात मोजे बुडवा. झोपण्यापूर्वी हे मोज घाला. या उपायाने कफ नाहीसा होईल.

पचनशक्ती कमकुवत असल्यास एका भांड्यात पाणी, काळे जिरे आणि बडीशेप मिसळा. हे उकळून घ्या. पाणी गार झाल्यावर यात मोजे बुडवा. हे घालून झोपल्याने पचनासंबंधी तक्रार दूर होईल.
 
पचनासंबंधी तक्रार दूर करण्यासाठी चिरलेलं सफरचंद, एक चमचा मध पाण्यात मिसळा. यात मोजे बुडवा आणि मग झोपण्यापूर्वी घाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi