Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कान स्वच्छ करण्यासाठी 5 सोपे उपाय

कान स्वच्छ करण्यासाठी 5 सोपे उपाय
कानात मळ जमणे सामान्य आहे. वेळोवेळी याची स्वच्छता आवश्यक आहे. योग्यरीत्या स्वच्छता न केल्यास पीडा, खाज, जळजळ किंवा बहिरेपणाला बळी जावं लागतं. कानाची योग्यरीत्या स्वच्छतेसाठी 5 सोपे उपाय:

1 गरम पाणी- कोमट पाणी कापसाच्या बोळ्याने कानात टाका. काही सेकंदाने कान उलटून पाणी बाहेर काढा. हा सर्वात सोपा उपाय आहे.

2 हायड्रोजन पराक्साइड- खूपच कमी मात्रेत हायड्रोजन पराक्साइड पाण्यात घोळून, कमी मात्रेत कानात टाका. आता कान उलटून द्रव बाहेर काढून टाका.
 
3 तेल- ऑलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीच्या गरम तेलात जरा लसूण टाका. कोमट झाल्यावर कापसाने कानात टाका आणि कान झाकून घ्या. अशाने मळ सोपेरित्या बाहेर पडतो.

4 कांद्याचा रस- कांदा वाफेत शिजवून किंवा भाजून याचा रस काढून घ्या. आता ड्रापरने किंवा कापसाने रसाचे काही थेंब कानात टाका. याने मळ बाहेर पडेल.
webdunia
5 मिठाचे पाणी- गरम पाण्यात मीठ घोळून घ्या. आता काही थेंब कापसाने कानात टाका आणि नंतर उलटून बाहेर काढून द्या. 

विशेष नोट: कानात वेदना किंवा जखम असल्यास हे उपाय करणे टाळावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बालकथा : मोठेपणा