Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

का आवश्यक आहे सूर्यास्तापूर्वी जेवण?

का आवश्यक आहे सूर्यास्तापूर्वी जेवण?
आयुर्वेदानुसार सूर्यास्तापूर्वी आहार घेणे आवश्यक आहे. जैन धर्मात तर या नियमाचे आवर्जून पालन केले जातं. तसेच हिंदू आणि जैन धर्मात आहाराचे काही नियम आहे जसे जेवण्यापूर्वी पाणी पिणे उत्तम, मध्ये पिणे मध्यम आणि नंतर पाणी पिणे निम्नतम मानले आहे. जेवण्याच्या अर्धा तास आधी आणि जेवणाच्या 45 मिनिटांनंतर पाणी प्यायला हवे. मध्ये हवं असल्यास केवळ एकदा पाणी पिऊ शकता. तसेच सकाळ पासून संध्याकाळपर्यत विभिन्न नियम आणि सिद्धांत तयार केलेले आहे. यामागे वैज्ञानिक कारणदेखील आहे.


पुढे वाचा काय आहे यामागील 4 कारण

जेवण करताना या गोष्टी लक्षात ठेवा...
 
कोणताही पशू आणि पक्षी रात्री आहार घेत नसतात. निसर्गाप्रमाणे आधी मनुष्यही सूर्यास्तापूर्वी आहार ग्रहण करत होते. पण नंतर आगीचा शोध लागला आणि सवयी बदलल्या. नंतर वीज निर्माण झाली आणि सवयीत पूर्णपणे बदल झाला. याचे काही नुकसान आहे परंतु पशू आणि पक्षी अजूनही रात्री आहार ग्रहण करत नाही. रात्री आहार ग्रहण करणार्‍यांना निशाचर असे म्हटले आहे. आणि मनुष्य निशाचर प्राणी नाही.
 
पहिले कारण: सूर्यास्तापूर्वी आहार घेतल्याने पाचक प्रणाली सुरळीत राहते. आहार पचायला पर्याप्त वेळ मिळतो.
 
दुसरे कारण: सूर्यास्तापूर्वी आहार घेतल्याने अनेक प्रकारच्या रोगांपासून बचाव होतो, कारण रात्री अनेक प्रकाराचे बॅक्टिरिया आणि इतर जीव आहाराला चिकटून जातात किंवा अन्नात स्वत: वृद्धी करू लागतात.
 

तिसरे कारण: सूर्यास्तानंतर वातावरणात नमी वाढते आणि यामुळे अनेक सूक्ष्म जीव आणि बॅक्टिरिया उत्पन्न होतात. सूर्य प्रकाशात त्याची वाढ होत नसते. पण सूर्यास्तानंतर ते सक्रिय होतात.
 
चौथे कारण: सूर्यास्तानंतर प्रकृती झोपते. वृक्ष, पशू आणि पक्षी सर्व झोपून जातात. आमचा आहार प्रकृतीचा भाग असून रात्री त्याची प्रकृती बदलते. प्रकृती बदल्यामुळे आहाराची गुणवत्ता घटते. सूर्यास्तानंतर आहार शिळं आणि दूषित होण्याची प्रक्रिया सुरू होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'तो' त्रास पुन्हा नको...