Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 11 January 2025
webdunia

कोरोनाकाळात पनीर खाण्याचे 10 फायदे जाणून घ्या

कोरोनाकाळात पनीर खाण्याचे 10 फायदे जाणून घ्या
, शुक्रवार, 21 मे 2021 (20:42 IST)
सध्या कोरोना संसर्ग सर्वत्र पसरलेला आहे. अशा वेळी रोग प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी प्रोटीनला महत्व दिले आहे. पनीर हे आपली तत्काळ आवश्यकता पूर्ण करण्यात मदत करत. पनीर हे आरोग्य आणि चव या दोन्हीचे उत्कृष्ट संयोजन आहे.
नवीन संशोधनात आढळून आले आहे की कोरोना संसर्ग आता  हवेत पसरत आहे आणि सामाजिक अंतराचे अनुसरण करूनही लोक याच्या विळख्यात अडकत आहेत. कोरोना रिकव्हरी बरोबरच पनीर  आपल्याला आरोग्याचे अनमोल फायदे देखील देतं, हे कसं फायदेशीर आहे जाणून घेऊ या. 
 
1 पनीरचे सेवन कधी करावे- दिवसात कोणत्याही वेळी आपण पनीरचे सेवन करू शकता, परंतु ते  प्रमाणात खावे.याचे अधिक सेवन केल्याने पचनाशी निगडित आजार किंवा गॅस करू शकतात. रात्री झोपताना याचे सेवन करू नका. झोपण्याच्या एक ते दोन तास पूर्वी याचे सेवन करावे. 
 
2  चयापचय - पचन आणि पाचक प्रणालीसाठी चयापचयची भूमिका खूप महत्वाची आहे. पनीरमध्ये आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असतात . जे अन्न पचनसाठी खूप उपयुक्त आहे. पाचक प्रणाली सहजतेने काम करण्यासाठी पनीर चे सेवन करणे अत्यंत फायदेशीर आणि महत्वाचे आहे.
 
3 कर्करोग - पनीरचा सर्वात मोठा फायदा हाच आहे, या बद्दल काहीच शंका नाही. या मध्ये कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. पोटाचा कर्करोग, कोलोन कर्करोग, स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारासाठी हे प्रभावी सिद्ध झाले आहे. 
 
4 मधुमेह- ओमेगा 3 ने समृद्ध पनीर मधुमेहासाठी अत्यंत प्रभावीपणे लढत. तज्ञ डॉक्टर म्हणतात की ते मधुमेहाच्या रुग्णांना देखील दररोज आहारात पनीर समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पनीर दोन्ही प्रकारच्या मधुमेहासाठी प्रभावी आहे.
 
5 एनर्जी किंवा ऊर्जा- दुधाने बनलेले असल्यामुळे पनीरमध्ये दुधाचे गुणधर्म असतात. या मध्ये ऊर्जा देणारे तत्वांचा समावेश आहे. हे शरीरासाठी फायदेशीर आहे. शारीरिक प्रशिक्षण देण्याऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे. 
 
6 गरोदर स्त्रिया- गर्भावस्थेत स्त्रियांना कॅल्शियम आवश्यक असत या साठी पनीरचे सेवन करणे फायदेशीर आहे. पनीर कॅल्शियमचं स्रोत आहे. 
 
7 पचनासाठी पनीर -पनीर खाल्ल्याने पाचन शक्ती मजबूत राहते, तसेच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पनीर फायदेशीर आहे.
 
8 दात आणि हाडे- पनीरचा सर्वात चांगला फायदा म्हणजे हे हाडे आणि दात मजबूत बनवत. तसेच कॅल्शियम आणि फ़ॉस्फ़ोरसचा  चांगला स्रोत आहे. दररोज पनीर चे सेवन केल्याने हाडांच्या समस्या, सांधेदुखी आणि दंत रोगांपासून बचाव करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.
 
9 व्यायाम - व्यायाम करण्याच्या पूर्वी किंवा नंतर याचे सेवन करू नये. व्यायाम केल्यानंतर याच्या सेवनाने पचन तंत्रेवर प्रभाव पडतो. 
 
10 शरीराला तंदुरुस्त ठेवतो - वजन नियंत्रित करण्यासाठी आणि स्वतःला तंदुरुस्थ ठेवण्यासाठी याचे संतुलित प्रमाणात सेवन करावे. 
 
आहार पचविण्यासाठी शरीराला प्रथिनांची सर्वात जास्त गरज असते आणि पनीर मध्ये भरपूर प्रथिने असतात. आपण कोरोना संसर्गाने बाधित  झाले असल्यास ,आपली प्रतिकारशक्तीच आपल्याला वाचवू शकते.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाच्या तिसऱ्या लाटे मध्ये मुलांची काळजी अशी घ्या -तज्ञांचा सल्ला