Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरगुती उपायांनी करा मधुमेहावर कंट्रोल

घरगुती उपायांनी करा मधुमेहावर कंट्रोल
घरगुती उपायमधुमेह कंट्रोल करण्यासाठीआजकाल आपण मधुमेह कंट्रोल करण्यासाठी किती उपाय करतो. त्याच्यावर आधारित गोळय़ा खातात तरी पण मधुमेह कंट्रोल होत नाही, मात्र हे घरगुती उपाय करून पाहा. 
 
1.फणसाच्या पानांचा रस प्रत्येक दिवस सेवन करावा.
 
2.लिंबाच्या कोवळय़ा पानांचा रस सेवन केल्यानंतर डायबिटीस कंट्रोलमध्ये राहते.
 
3.डायबिटीस झालेल्या व्यक्तीने पथ्य पाळणे, योगा करणे, दररोज सकाळी फिरायला जाणे व शुद्ध हवा घेणे. गवतावर उघड्या पायाने चालणे आदी गोष्टी केल्या तरीही मधुमेह नियंत्रणात राहतो.
 
4.दोन ग्रॅम दालचिनी चूर्ण आणि एक लवंग पाण्यात उकळून घ्या. १५ मिनिटांनंतर हे पाणी सेवन करा. प्रत्येक दिवशी सकाळी आणि संध्याकाळी सेवन केले तरी चालते.
 
5.फरसबी आणि पत्ता कोबीच्या रसाचे मिश्रण प्यायले तरी मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो.
 
६.तसेच भेंडीची भाजी बनवून खाल्ल्याने किंवा भेंडीला रात्री भिजत ठेवून सकाळी उठल्यावर ते पाणी प्यायल्यानेही मधुमेह नियंत्रणात राहतो.
 
७. बेलाच्या आणि सीताफळाच्या पानांचे चूर्ण तयार करून प्रत्येक दिवशी मधुमेह असलेल्या व्यक्तीने घेतले तर मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi