Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तीक्ष्ण बुद्धी हवीय.. हा घ्या सर्वात सोपा उपाय!

तीक्ष्ण बुद्धी हवीय.. हा घ्या सर्वात सोपा उपाय!
, गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (17:03 IST)
तीक्ष्ण बुद्धी आणि स्मरणशक्ती हवी असेल तर तुम्हाला वापरता येणार आहे हा सगळ्यात सोपा उपाय जो तुम्हाला नेहमीच फायदेशीर ठरू शकतो. ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया’च्या संशोधकांनी त्यांच्या संशोधनात असा दावा केलाय की, कम्प्युटरवर सतत काम करताना तुम्ही करत असणार्‍या फाईल्स सेव्ह करत राहणे तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. संशोधक बेंजामिन स्टॉर्मच म्हणण्यानुसार, सतत फाईल्स सेव्ह करणार्‍या व्यक्तींची बुद्धी अतिशय सक्रिय असते. या संशोधनासाठी 20 विद्यार्थ्यांवर परीक्षण करण्यात आलं.. आणि, फाईल्स सतत सेव्ह केल्यामुळे त्यातील गोष्टी तुम्हाला जास्त आठवणीत राहतात तसेच त्यामुळे तुमची बुद्धी सक्रिय होण्यास मदत होते, असा निष्कर्ष मिळालेल्या माहितीवरून काढण्यात आला. हा शोध ‘सायकोलॉजिकल सायन्स जर्नल’मध्ये प्रकाशित झालाय.

Share this Story:

Follow Webdunia marathi