Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाचक पेरू

पाचक पेरू
हे सर्वात स्वस्त फळ. बहुतेक सर्व देशांत पेरू आढळतो. पेरूच्या दोन जाती प्रसिद्ध आहेत. एका जातीत पांढरा गर असतो तर दुसर्‍यात तांबूस रंगाचा गर असतो.

पेरूमधील फिकट रंगाचे लहानसे बी तेलयुक्त असते. या बियांपासून मिळणारे तेल सुवासिक असून आयोडिनयुक्त असते. त्याचा उपयोग औषध तयार करण्यासाठी केला जातो.

पेरू जंतुनाशक तसेच वेदनाहारी आहे. तो तृषाशामकही आहे. पेरूमुळे भ्रमिष्टपणा नाहीसा होतो. वाताचा त्रास होत असल्यास पेरूचा रस द्यावा. पेरूच्या सेवनानेही वात नाहीसा होतो.

पेरूच्या सेवनाने बद्धकोष्ठता नष्ट होते. पेरूमध्ये पाचक गुणधर्मही आहेत. कातडी कमावण्यासाठी पेरूच्या पानांचा उपयोग होतो. कातडी वस्तू तयार करण्यापूर्वी त्यावर पेरूच्या पानांची प्रक्रिया करतात. यामुळे कातडीचा दर्जा उंचावतो.

मळमळ, उलटी किंवा अतिसाराचा त्रास होत असल्यास पेरूच्या कोवळ्या पानांचा काढा उपयुक्त ठरतो. हा काढा पचनशक्ती वाढवण्यासही गुणकारी ठरतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi