Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पायाला कांदा लावून झोपणे फायदेशीर

पायाला कांदा लावून झोपणे फायदेशीर
कांद्यातील अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी वायरल तत्त्वांमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. रात्री झोपताना पायमोजे घालून त्यात कांद्याच्या चकत्या ठेवण्याने शरीरातल्या घातक जिवाणू आणि किटाणूंचा नाश होतो तसेच रक्तशुद्धी साधते. पाहू याचे काही खास फायदे:

* कांद्यामधील फॉस्फरिक अॅसिड रक्तामध्ये शोषलं जातं आणि रक्तशुद्धी होते.



कांद्याच्या उग्र वासामुळे खोलीतील हवा शुद्ध होतेच पण पायाची दुर्गंधीही नाहिशी होते. याने घात रसायनं आणि विषारी तत्त्व शरीराबाहेर टाकण्यास मदत होते.

* हा उपाय हृदयस्वास्थ्यासाठीही उपकारक ठरतो.
 
पायाजवळ कांद्याच्या चकत्या असल्यानं पोटातील संसर्ग दूर होतो. त्याचबरोबर किडनीशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.

webdunia

 
या उपायानं छोट्या आतड्यासंबंधीच्या त्याचप्रमाणे मूत्राशयासंबंधीच्या समस्याही दूर होतात.

* शरीरामध्ये अधिक उष्णता असणार्‍यांनी हा उपाय अवश्य करावा. याने अतिरिक्त उष्णता शोषली जाते आणि उष्णतेचा त्रास कमी होतो.

webdunia

 
त्वचेनजीक कांद्याच्या चकत्या असल्यास शरीराचं तापमान वाढत नाही. त्यामुळे ताप आलेल्या अवस्थेमध्ये हा उपाय अवश्य करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi