Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या भाज्या उन्हाळ्यात नक्की खाव्यात ..

या भाज्या उन्हाळ्यात नक्की खाव्यात ..
पालक : आरोग्य उत्तम राहण्यासाठी पालेभाज्या खूप उपयुक्त असतात. आपल्या शरीरात ताकद व चपळता निर्माण होण्यासाठी पालक उपयुक्त असतो. कच्चा पालक फार गुणकारी असतो. याच्या सेवनामुळे पचनक्रिया सुरळीत काम करते. खोकला आणि फुप्फुसात आलेली सूज कमी करण्यासाठी पालकच्या रसाने गुळण्या कराव्यात. पालकच्या रसाने दृष्टीदोषही कमी होतो. तसेच स्मरणशक्तीही वाढते. 
 
शेंगा : पचनक्रियेशी संबंधित आजार शेवग्याच्या सेवनाने नष्ट होतात. दस्त, कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताजा रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून प्यायल्यास आराम मिळतो. शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे. शेवग्याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

दोडका : दोडक्याची भाजी ही आरोग्यास लाभकारी असते. काही जणांना दोडक्याची भाजी खाण्यास आवडत नाही, असे लोक त्याची चटणी करतात. त्याची चटणी ही चविष्ट असते. साधारण २-३ दिवस ती फ्रीजमध्ये सहज राहते. कावीळ झालेल्या व्यक्तीच्या नाकामध्ये दोडक्याचे २-३ थेंब टाकल्यास नाकातून पिवळा द्रव पदार्थ बाहेर पडतो. या उपायाने कावीळ लवकर बरी होते. 
 
webdunia

 




बीट : बीट हे शरीरातील रक्त वाढवण्यास उपयुक्त असते. बीटमध्ये किडनी आणि पित्ताशय स्वच्छ ठेवण्याची शक्ती असते. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास किंवा अर्धा ग्लास बीटचा रस आवश्यक घ्या. तसेच तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी बीट सेवन करणे गरजेचे आहे. 

तोंडली : भारतात आयुर्वेदिक औषधी वनस्पती मानली जाते. याच्या फळांची भाजी करतात. फळे म्हणजे तोंडली. ही हिरव्या रंगाची असतात. आपल्या समाजात कित्येक लोकांना तोंडली म्हणजे काय व त्यांची भाजी कशी करतात हेच ठाऊक नसते. तोंडलीमध्ये कॅरोटीनव्यतिरिक्त प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियमसारखे महत्त्वपूर्ण तत्त्व आढळून येते. 

webdunia

 

 
पत्ता कोबी : लहान मुले पत्ता कोबीचे अधिक प्रमाणात सेवन करतात. लहान मुलांचे वजन कमी असल्यास त्यांना अर्धा ते १ ग्लास कोबीचा रस प्यायला द्यावा. त्यामुळे त्यांचे वजन वाढण्यास मदत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi