Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वजन घटवताय?

वजन घटवताय?
, रविवार, 25 जानेवारी 2015 (00:05 IST)
वजन घटविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून फळांच्या रसाला प्राधान्य दिले जाते. कमी अन्न घेऊन फळांच्या रसावर जोर दिला जातो आणि वजन कमी होण्याची वाट पाहिली जाते. मात्र हा अगदी चुकीचा समज आहे. फळांच्या रसाने वजन घटत नाही उलटपक्षी वाढते. फळांच्या रसाच्या सेवनामुळे एका मिनिटात १५0 कॅलरीज वाढतात. 
 
ज्यूस, मध, ऑलिव्ह ऑईल, ब्राऊन ब्रेड, सुकामेवा आदी घटक वजन वाढीस साहाय्यभूत ठरतात. तज्ज्ञांच्या मते, ज्यूसमध्ये फळांमधील फायबर नष्ट होते आणि केवळ शर्करेची मात्रा उरते. अशा ज्यूसमध्ये भरपूर पोषणमूल्ये असतात. त्याचप्रमाणे त्यातून मिळणार्‍या कॅलरीजही जास्त असतात. त्यामुळे याने वजन कमी न होता वाढते. एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये ५0 कॅलरीज असतात, त्याचप्रमाणे मेमनमो सॅच्युरेटेड फॅट्सची मात्रा भरपूर असते. लो फॅट दही किंवा लो फॅट बिस्किटे पुन्हा पुन्हा खावीशी वाटत असल्यामुळे ओव्हर डाएटचा धोका वाढतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi