Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष नको

सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष नको
सर्दी-खोकला, सततच्या शिंका आणि अंगातला बारीक ताप या लक्षणांकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. बरेचदा यावर वेळीच औषधोपचारही केले जात नाहीत. दोन-चार दिवसांत दुखणं बरं होईल असं समजून दुर्लक्ष केलं जात पण त्यापेक्षा जास्त काळ सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवणं हे काही व्याधींचं लक्षण असू शकतं. म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. 

बहिरेपणा : सर्दी-खोकला झालेला असताना कानांना दडे बसणे, स्पष्ट ऐकू न येणे हा त्रास समजू शकतो. मात्र हे बहिरेपणाचं लक्षणंही असू शकतं. या अवस्थेमध्ये कान आणि मेंदूमध्ये असलेली संकेत यंत्रणा नाकाम होते आणि बहिरेपणा जाणवतो. सर्दी-खोकल्याप्रमाणेच कानामध्ये सूज आणि दाबही जाणवतो.

फुप्फुसामध्ये संसर्ग : दीर्घकाळ सर्दी-खोकला टिकणं हे मेथिलीन रेजस्टिंट स्टाफिलोकोकस ऑरस (एमआरएस) नामक जंतूचा प्रादुर्भाव असू शकतो. यामुळे फुप्फुसांमध्ये जंतुसंसर्ग होतो. लहान मुलांना निमोनिया झाला असता हा धोका सर्वाधिक असतो. बरेचदा हा आजार प्राणघातक ठरतो.

मेंदू आणि यकृताला सूज आल्यास सर्दी-खोकला, उलट्या आणि कमालीचा थकवा ही लक्षणं आढळतात. विशेषत: लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांना याचा धोका असतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi