Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वस्थ झोपेसाठी खास सल्ला!

स्वस्थ झोपेसाठी खास सल्ला!
झोपण्यापूर्वी अर्धा चमचा खासखस, साखर आणि मध एक‍त्र करून हे चाटण घेतल्यास झोप चांगली लागते. 
 
रात्रीच्या जेवणात कच्चा कांदा असल्यास झोपेत व्यत्यय येत नाही. 
 
झोपण्याआधी गरम पाण्यात तुळशीची आणि पुदिन्याची पानं घालून आंघोळ केल्यास अतिशय सुखकर झोप लागते. 
 
रात्रीच्या जेवणात फळांचा रस, ताज्या भाज्या आणि सार असावं. झोपण्यापूर्वी खूप पाणी पिऊ नये तसंच अन्य उत्तेजक द्रव पदार्थ टाळावेत. विशेषत: साखरेचा वाप असलेल पेय टाळावं. कारण साखरेमुळे त्वरित ऊर्जा मिळते आणि झोपेवर परिणाम होतो. साखरेऐवजी मधाचा वापर करावा. 
 
झोपण्याआधी प्राणायम केल्यास शांत आणि स्वस्थ झोप लागण्यास मदत होते. एखादं पुस्तक वाचत अंथरुणावर पडल्यासही लवकर झोप लागते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपल्या माहीत आहे का रवा खाण्याचे 6 फायदे ?