Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पांढरे डाग मिटवू शकतात हे 7 उपाय

webdunia
शरीरावर कोणत्याही पांढरे डाग पडले की ते सोपे रित्या बरे होत नाही. डॉक्टर्सप्रमाणे याचे विभिन्न कारण असू शकतात. पण काही घरगुती उपायाने हे दूर होऊ शकतात: 
1 तांबा- तांबा तत्त्व त्वचेत मेलनिन निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्यावे.
webdunia

2. नारळाचे तेल- हे त्वचेला पुन्हा पूर्वीसारखं करण्यात मदत करतं. यात जीवाणूरोधी आणि संक्रमण विरोधी गुण आढळतात. प्रभावित त्वचेवर दिवसातून 2 ते 3 वेळा नारळाच्या तेलाने मसाज करणे फायद्याचे ठरेल.
webdunia


3. हळद- 250 मिलीलीटर मोहरीच्या तेलात 5 मोठे चमचे हळद पावडर मिसळून लेप तयार करा. हे लेप दिवसातून दोनदा प्रभावित त्वचेवर लावा. किमान 1 वर्षापर्यंत हा उपाय अमलात आणा. याव्यतिरिक्त आपण हळद पावडर आणि कडुनिंबाच्या पानांचा लेपही लावू शकता.
webdunia

4. कडुनिंब- कडुनिंब सर्वोत्तम रक्तशोधक आणि संक्रमण विरोधी तत्त्वाने भरपूर औषधी आहे. कडुनिंबाचे पाने ताकात पिसून लेप तयार करा. हा लेप त्वचेवर लावा आणि पूर्णपणे वाळल्यावर धुऊन टाका. याव्यतिरिक्त आपण कडुनिंबाचे तेलही वापरू शकता. कडुनिंबाचा ज्यूस पिणेही उत्तम राहील.
webdunia

5. लाल माती- लाल माती भरपूर मात्रेत तांबा आढळतो, जे मेलनिन निर्मिती आणि त्वचेला पूर्ववत करण्यात मदत करतं. आल्याच्या रसात लाल मातीचे लेप तयार करून प्रभावित त्वचेवर लावणे फायद्याचे ठरेल.
webdunia

6. आलं- रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी आणि मेलनिन निर्मितीसाठी आलं फायदेशीर आहे. आल्याचं रस पाण्यात मिसळून प्यावं. आल्याचं रस प्रभावित त्वचेवर लावावं.
webdunia

7. सफरचंद व्हिनेगर- सफरचंद व्हिनेगर पाण्यासोबत मिक्स करून प्रभावित त्वचेवर लावावं. 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सफरचंद व्हिनेगर मिसळून प्यावं.
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घरगुती उपायांनी घालवा कोंडा