फिट राहणे आणि सिक्स पॅक्स एब्स असणे फॅशन झाले आहे. अधिक वेळ जिम करून किंवा वजन उचलून एब्स लवकर बनतील असे विचार करणार्यांना हे ही माहीत असावे की योग्य आहार नसल्यास एब्स बनणे शक्य नाही. बॉडी बनवण्यासाठी प्रोटीनची भूमिका महत्त्वाची असते. एका स्वस्थ व्यक्तीला दररोज प्रती किलो वजनाप्रमाणे एक ग्राम प्रोटीनची आवश्यकता असते. ही मात्रा दररोजच्या कार्यशैलीप्रमाणे कमी जास्त असू शकते. यासोबतच शरीरातील मेटाबॉलिझम जलद असावे. हे सर्व संतुलित ठेवण्यासाठी आहारा या 15 वस्तू सामील करण्याची गरज आहे तर जाणून घ्या सिक्स पॅक्स एब्स साठी कसा असावा आहार:
ब्रोकोली
यात कॅलरीज कमी प्रमाणात आढळत असून हे फायबरयुक्त असतं. याने वजन कमी होण्यात मदत मिळते.
दालचीनी
एका रिसर्चप्रमाणे दालचीनी शरीरात इन्सुलिन प्रतिक्रिया वाढवण्यात मदत करते ज्याने पोटावर फॅट्स एकत्र होत नाही.
मश्रुम, रताळे
हे लो कॅलरी फूड असून याने पोटही भरतं आणि स्नायू बनतात.
सफरचंद
यात अँटीऑक्सिडेंट पॉलीफेनोल असतात जे शरीरात चरबी जमा होऊ देत नाही.
ग्रीन टी, मिरची
चयापचय क्रिया सुधारते.
ब्लूबेरीज
हे नवीन चरबी पेशी निर्मिती रोखण्यात मदत करतं.
ग्रेपफ्रूट
यात आढळणारे रसायन इन्सुलिन स्तर कमी करण्यात मदत करतात.
ओट्स
ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळत ज्याने पोट भरलेलं जाणवतं.
संत्रं
हे रक्तात हार्मोनचे स्तर कमी ठेवण्यात मदत करतं.
अक्रोड
अक्रोड फायबर, अँटीऑक्सिडेंट्स आणि असंतृप्त फॅटी एसिडमध्ये उच्च असतात ज्याने रक्तदाब संतुलित ठेवण्यात तसेच ताण कमी करण्यात मदत मिळते.
सॉल्मन मासोळी
ही मॅग्नीशियमचा एक मोठा स्रोत असून याचे सेवन केल्याने कोर्टिसोलचे स्तर नियंत्रित राहण्यात मदत मिळते.