Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एका विवाहित जोडप्याची गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी

knee replacement
, शुक्रवार, 23 जून 2023 (19:53 IST)
साठीनंतर ४०% व्यक्तींना सतावतोय गुडघेदुखीचा त्रास: डॉ कुणाल माखिजा
मुंबई: नुकतीच नवी मुंबईतील एका विवाहित जोडप्याने गुडघे प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करुन असून सप्तपदी घेताना दिलेल्या वचनांची पूर्तता केली. आयुष्यभर एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे वचन निभावताना या जोडप्याने शारीरीक आव्हानांवर मात करत यशस्वी गुडघे प्रत्यारोपण केले. मिस्टर आणि मिसेस शाह या जोडप्याला लग्न होऊन 50 वर्षे लोटली असून यापुढे देखील एकत्र चालण्याचे वचन पाळत एकाच दिवशी दोघांवरही यशस्वी गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करून गुडघेदुखीपासून मुक्त झाल्याचा आनंद साजरा केला.
 
डॉ. कुणाल माखिजा, जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, मुंबई सांगतात की, संधिवातामुळे गुडघ्यांमध्ये होणाऱ्या वेदनेपासून मुक्त होणायासाठी  प्रत्यारोपणाचा पर्याय उत्तम ठरतो. अंशतः गुडघे प्रत्यारोपणासारख्या प्रगत तंत्रांसह, रुग्णांना जलद पुनर्प्राप्ती मिळविता येते आणि ही शस्त्रक्रिया वेगवेगळ्या वयोगटातील, वजनाच्या व्यक्तींसाठी आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, आणि हृदयासारख्या कोमॅार्बिडीजीट असलेल्या व्यक्तींसाठी योग्य ठरते. पनवेल येथील श्री. वसंत भाई (७७) आणि श्रीमती कैलाश बेन शहा (६८) यांना ऑस्टियोआर्थरायटिसमुळे गुडघेदुखीची समस्या जाणवत होती, त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला होता. वेदनाशामक औषधे घेतल्याशिवाय त्यांना आराम मिळत नसे आणि सामाजिक कार्यक्रमातही  सहभागी होऊ शकत नव्हते.
 
डॉ. कुणाल माखिजा सांगतात की, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जवळपास ४०% व्यक्तींना गुडघेदुखीचा त्रास सतावतो. त्यांना पेनकिलर सारख्या पर्यायांचा वापर करावा लागतो ज्यांच्या अतिसेवनान् मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे अशी औषधे टाळण्याचा सल्ला दिला जातो.
 
वर्षानुवर्षे सांधेदुखी आणि त्यामुळे जाणवणाऱ्या अस्वस्थतेमुळे मिस्टर आणि मिसेस शाह यांनी गुडघा बदलण्याची यशस्वी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. पती-पत्नी ऑस्टियोआर्थरायटिसने त्रासले होते, झीज झाल्याने त्यांच्या गुडघ्यांसंबंधीत तीव्र वेदना सतावत होत्या.  ज्यामुळे त्यांना चालणे किंवा दैनंदिन कामात अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर दोन्ही गुडघ्यांच्या यशस्वी शस्त्रक्रियांनंतर आता त्यांना पुर्ववत आयुष्य जगता येत आहे आणि ते  पुन्हा त्यांच्या पायावर उभे राहू शकत असल्याचेही डॉ माखिजा यांनी सांगितले.
 
 डॉ माखिजा पुढे सांगतात की, गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया वेदना कमी करून रुग्णांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा करते. वर्षानुवर्षे सांधेदुखीचा सामना करणाऱ्या जोडप्यासाठी हे तर एक वरदान ठरले. आता हे रुग्ण पूर्णतः बरे झाले आहेत आणि कोणत्याही वेदनाशिवाय चालु शकत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ways to Clean a Refrigerator फ्रीज साफ करताना या गोष्टी लक्षात ठेवा