Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्यासाठी फायदेशीर आहे आवळा आणि मध, जाणून घ्या फायदे

Gooseberry And Honey Benefits
, शनिवार, 27 एप्रिल 2024 (15:38 IST)
आवळा आणि मध दोन्ही आपल्या औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. या दोघांना एकसाथ सेवन केल्यास हे एक चांगले आरोग्यदायी मिश्रण बनते. जे अनेक प्रकारच्या आजारांशी लढण्यास मदत करते. चला जाणून घेऊ या आवळा आणि मध एकत्रित सेवन केल्यास कोणते लाभ होतात. 
 
रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवते 
आवळा व्हिटॅमिन C चा एक समृद्ध स्रोत आहे. जो आपल्या शरीरातील रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवण्यासाठी प्रमुख भूमिका निभावतो. तसेच मध अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीफंगल गुणांनी परिपूर्ण असते. जे संक्रमणशी लढायला मदत करते. आवळा आणि मधाचे एकत्रित सेवन शरीराला आजरांपासून दूर ठेवते. 
 
पाचन तंत्र सुरळीत ठेवते 
आवळ्यामध्ये असलेले फायबर पाचन तंत्र सुरळीत ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता, अपचन, एसिडिटी सारख्या समस्यांपासून अराम देते. जे पोटातील अल्सरवर देखील उपयोगी आहे. 
 
त्वचेसाठी फायदेशीर 
आवळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट त्वचेतील मुक्तकणांना होणाऱ्या नुकसानपासून वाचवते. तसेच सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. तसेच मध त्वचेला नैसर्गिकरित्या मऊ ठेवते. 
 
केसांसाठी फायदेशीर 
आवळा केसांसाठी एक नैसर्गिक कंडिशनर आहे जो केसांना मजबूत बनवतो. आवळा केस गळती थांबवतो. तसेच केसांना दाट आणि चमकदार बनवतो. तसेच मध केसांना पोषण देते. 
 
वजन कमी करण्यासाठी उपयोगी 
आवळा आणि मध दोन्ही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. आवळा मेटाबॉलिज्मला वाढवते तसेच कॅलरी कमी न्यास मदत करते. 
 
खोकला आणि सर्दीपासून आराम
आवळा आणि मध दोन्ही खोकला आणि सर्दीसाठी उपयोगी आहे. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सीडेंट खोकला आणि सर्दीच्या लक्षणांना कमी करतात. मध गळ्यातील खवखव कमी करते आणि खोकल्यापासून अराम देते. 
 
एनिमिया पासून बचाव 
आवळा आयरनचा एक चांगला स्रोत आहे. जो एनिमिया दूर ठेवण्यासाठी मदत करतो. तसेच मध शरीरातील आयरनचे प्रमाण वाढवते. 
 
सावधानी 
जर तुम्हाला डायबिटीज असले तर, आवळा आणि मधाचे सेवन कमी प्रमाणात करावे. तसेच तुम्हाला एलर्जी असेल तर आवळा आणि मध सेवन करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मानसिक आरोग्य प्रभावित करते आयरनची कमी, जाणून घ्या लक्षण