आपण हे ऐकलेच असणार की दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला पळवून लावा. म्हणजे दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आपण डॉक्टरांच्या फेऱ्यांपासून म्हणजे आजारांपासून लांब राहता. कॅल्शियम, फायबर सह अनेक पौष्टिक घटकाने समृद्ध असलेले सफरचंदाचे सेवन केल्याने आपण निरोगी राहता. या सह हे आपल्या पचन क्रियेला देखील चांगले ठेवते. पचन क्रिया चांगली असणे म्हणजे आपले शरीर बऱ्याच रोगांपासून संरक्षित राहत आणि आपण स्वतःला ताजेतवाने आणि निरोगी अनुभवाल.
सफरचंदाचे नियमित सेवन केल्यानं आपली प्रतिकारक शक्ती देखील वाढते. चला तर मग आपण सफरचंदाच्या फायद्यांबद्दल बोलू या.
सफरचंद खाणं आरोग्यास खूप फायदेशीर आहे. या मुळे आरोग्याचा अनेक समस्यांवर मात करता येते. पोटात जंत झाले असल्यास तर रुग्णाला दररोज दोन सफरचंद खायला द्या. किंवा त्याला दररोज एक ग्लास ताज्या सफरचंदाचा रस देखील देऊ शकता. या मुळे पोटातील जंत मरतात आणि शौचास निघून जातात.
सफरचंदाचे सेवन केल्याने अनेक रोग दूर केले जाऊ शकतात. ज्या लोकांना डोकेदुखी, चिडचिड, अशक्तपणा किंवा विसर पडण्याची सवय असल्यास तर त्यांनी जेवण्याचा पूर्वी दोन ताज्या सफरचंदाचे सेवन केले पाहिजे. अश्या रुग्णांनी सामान्य चहा किंवा कॉफीचे सेवन न करता फक्त सफरचंदाचा चहा प्यावा.
ज्या लोकांचे हृदय कमकुवत आहे किंवा हृदयाचे ठोके कमी किंवा जास्त होत असल्यास, तर त्यांना चांदीचे वर्क लावलेल्या सफरचंदाच्या मोरावळ्या (मुरंबा) चे सेवन केले पाहिजे.
सफरचंदामध्ये असलेले फायबर लठ्ठपणा कमी करण्यास उपयुक्त आहे, ज्यामुळे एखाद्या व्यक्ती इतर आजाराला बळी पडण्यास वाचतो. अनिद्राच्या उपचारातही सफरचंद उपयोगी आहे.
आपणास रात्री झोप न येत असल्यास किंवा मध्यरात्री जाग आल्यावर पुन्हा झोप लागत नसल्यास झोपण्यापूर्वी एका सफरचंदाचा मोरावळा खा आणि त्यावर कोमट दूध प्या. चांगली झोप येणार.
बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास दर रोज सकाळी उठल्यावर अनोश्यापोटी दोन सफरचंद चावून चावून खा. या मुळे बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो. पचन शक्ती कमकुवत झाली असल्यास ते दूर होईल आणि भूक वाढेल. या व्यतिरिक्त सफरचंद खाण्याचे बरेच फायदे आहेत.