Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दूध पिण्यापूर्वी या गोष्टी खाणे टाळा

दूध पिण्यापूर्वी या गोष्टी खाणे टाळा
, सोमवार, 17 मे 2021 (17:29 IST)
नियमितपणे दूध पिणे ही चांगली सवय आहे, परंतु आपल्याला ते पिण्याचे काही नियम माहित असतील तरच दूध पिण्याचा पुरेपूर फायदा मिळेल .खाण्यापिण्याच्या अशा काही गोष्टी आहेत ज्या दूध पिण्यापूर्वी काही तासांपूर्वी चुकून ही खाऊ नये अन्यथा आरोग्यास त्रास संभवतो.
 
1 तीळ आणि मीठ -तीळ आणि मीठाने बनवलेल्या गोष्टी खात असाल तर त्यानंतर दुधाचे सेवन करु नका. हे आपल्याला त्रासदायक होऊ शकत . हे खाल्ल्यावर 2 तासांने दूध प्या.
 
2 उडीद - उडीद डाळ खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन केल्यास पोट व आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणून, उडीद डाळ आणि दुधाचे सेवन करण्यात कमीतकमी दोन तासाचा अंतर  ठेवा.
 
3 आंबट फळे- आंबट फळांमध्ये आम्लीय गुणधर्म आहे. या फळांच्या सेवन केल्यावर दुधाचे सेवन करणे हानिकारक आहे. म्हणून, या दोघांचे सेवन करताना दीर्घ अंतर असणे आवश्यक आहे.
 
4 मासे - जर मासे खाण्याची आवड असेल तर चुकून ते खाल्ल्यानंतर दूध पिऊ नका. अस केल्याने आपल्याला अन्न विषबाधा तसेच पोटाच्या इतर समस्या देखील उद्भवू शकतात. 
 
5 दही खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करणे टाळा, अन्यथा आपल्याला पोटाची समस्या आणि पचनाचा त्रास होऊ शकतो.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एप्पल सायडर व्हिनेगर वापरण्याची योग्य जाणून घ्या