Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ayurvedic Tips :निरोगी पाचन तंत्रासाठी या आयुर्वेदिक टिप्सचे अवलंब करा

health
, शनिवार, 4 जून 2022 (16:30 IST)
अनेक वेळा अपचन, बद्धकोष्ठता, गॅस इत्यादी पचनसंस्थेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण  या आयुर्वेदिक टिप्स देखील अवलंबवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 भूक लागेल तेव्हाच खा. आधीचे जेवण पचल्यावरच खा. कधीकधी आपल्याला असे जाणवते  की आपण भुकेले आहोत, हे निर्जलीकरणामुळे देखील होऊ शकते. त्यामुळे आपण आपल्या  शरीराशी सुसंगत रहा आणि भूक लागल्यावरच खा.
 
2 जेवण आरामात बसून खा. जेवताना फक्त जेवणावर लक्ष केंद्रित करा. या काळात टीव्ही, पुस्तक, फोन आणि लॅपटॉप पाहू नका.
 
3 गरम आणि ताजे शिजवलेले अन्न खा. फ्रीज मधील थंडगार अन्न खाणे टाळा.गरम आणि ताजे अन्न खाल्ल्याने आपली पचनशक्ती टिकून राहते. हे आपल्या पाचन एंजाइमला योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते.
 
4 विसंगत अन्न एकत्र खाणे टाळा. यामुळे पोटात बिघाड होऊ शकतो. विसंगत अन्नामध्ये फळे आणि दूध, मासे आणि दूध इ.खाणे टाळा.
 
5 घाई घाई ने खाऊ नका. अन्न फक्त गिळू नका तर चावून खा. चावून चावून अन्न खाल्ल्याने  पचनसंस्था निरोगी राहते.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तरुण वयोगटातील लोक हृदयविकाराचे बळी का होतात? जाणून घ्या हे 4 कारण