काही लोकं रेग्युलर जिम जातात आणि अनेक लोकं विचार करत असतात की जिम ज्वाईन केले पाहिजे. या दोन्हीतून आपण कोणत्याही श्रेणीत असला तरी त्यासाठी थोडी काळजी घ्यावी लागते. वर्कआउट सुरू करण्यापूर्वी नेमके काय करावे ते बघू या:
* रात्री शांत आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. याने आपलं आरोग्य उत्तम राहील. झोपेतून उठल्यावर लगेच जिमला जाऊ नका. थोडा तरी वेळ जाऊ द्या.
* व्यायाम सुरू करण्यापूर्वी पाणी प्या. जिममध्ये व्यायाम सुरू करण्याच्या अर्ध्या तासाआधी कमीत कमी 590 एमएल पाणी पिणं गरजेचं आहे. म्हणजे पोटभर पाणी पिऊन जाऊ नका.
* कार्यक्षमता वाढवण्यासाठी ब्लॅक कॉफीचे सेवन करू शकता. कॅफेनमुळे शरीरातल्या फॅटी अॅसिड वापराची प्रक्रिया वेगवान होते.
* जिममध्ये जाण्याआधी फ्रूट्स किंवा प्रोटीन शेक याचे सेवन करू शकता. पण आहार आणि व्यायामात तासाभराचा तरी अंतर असावा हे लक्षात असू द्या.
* जिममध्ये साजेसे कपडे घाला. याने व्यायाम करणे सोपे आणि आरामदायक ठरतं.
* स्वत:ला झेपतील ते व्यायाम करा. उगाच कोणाचे पाहून त्यांची बरोबरी करायला जाऊ नका किंवा क्विक रिझल्टसाठी अती व्यायाम करणे टाळा.
* गाणी ऐकत जिम केल्याने उत्साह येतो. आणि व्यायाम करायला कंटाळवाणीही वाटतं नाही. म्हणून आपली प्ले लिस्ट अपडेट करत राहा आणि जोष जगवणारी गाणी ऐका.