Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उन्हाळ्यात सोडा, पॅक्ड ज्यूस वगळून केवळ प्या पाणी

उन्हाळ्यात सोडा, पॅक्ड ज्यूस वगळून केवळ प्या पाणी
उन्हाळ्यात पेय पदार्थांचे सेवन वाढतं. अनेक लोकं दिवसभर केवळ वेगवेगळ्या प्रकाराचे पेय पदार्थ पितात. कोल्ड ड्रिंक्स, सोडा, पॅक्ड ज्यूस किंवा कॅफिन. पण हे पेय पदार्थ आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे का हा विचार न करता केवळ तात्पुरतं थंड वाटावं म्हणून असे पेय पिणे कितपत योग्य आहे. परंतू आपण हे पेय पदार्थ वगळता केवळ पाणी प्यायला तर अनेक बदल दिसून येतील.

तर जाणून घ्या उन्हाळ्यात केवळ पाणी पिण्याचे किती फायदे आहेत ते:
 
वजन कमी होतं
हल्लीच्या लाइफस्टाइलमध्ये सगळे वाढत असलेल्या वजनामुळे परेशान असतात. अशात वजन कमी करण्यासाठी शुगर असलेले पेय पदार्थ न पिता केवळ पाणी पिणे योग्य ठरेल. याने अधिक प्रमाणात कॅलरी बर्न होण्यात मदत मिळेल.
 
चयापचय क्षमता वाढेल 
केवळ पाणी पिण्याने आपली चयापचय क्षमता वाढेल आणि यामुळे ऊर्जेचे स्तरदेखील. म्हणून दिवसभर खूप पाणी प्या. या व्यतिरिक्त अधिकाधिक पाणी पिण्याने आपल्याला ध्यान केंद्रित करण्यात देखील मदत मिळेल.
 
खाण्यावर नियंत्रण
आपली डायट घेल्यानंतरही आपल्या भूक जाणवत असेल तर केवळ एक ग्लास पाणी प्यावे. याने वजन नियंत्रित करण्यात मदत मिळेल. अनावश्यक कॅलरीज कमी करण्यासाठी पाणी पीत राहावे.
 
विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढतं
अधिक पाणी पिण्याने शरीरात विषारी पदार्थ बाहेर पडतात. ज्यामुळे त्वचेचं आरोग्य उत्तम राहतं आणि वय वाढलं तरी तारुण्य टिकून राहतं. या व्यतिरिक्त अनेक आजार हाय ब्लड प्रेशर, हृदयासंबंधी आजार आणि अपचन सारखे आजार होण्याचा धोका टळतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेवणात लज्जत आणणारा कैरीचा आंबट-गोड-तिखट तक्कू