Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Black Chaney हृदयाची काळजी घेणारे काळे चणे

black cnahe for health
, शनिवार, 10 जून 2023 (08:49 IST)
व्हिटॅमिन, तंतुयुक्त, खनिजाच्या भांडारसह काळे चणे हे समृद्ध जीवन सत्त्व आहे. ह्यात चरबी फार कमी असते. आपल्या आहारात हे समाविष्ट केल्याने आरोग्यासाठी लाभप्रद ठरतं. 
 
काळे चणे आहारात घेतल्याने क्लोरोफिल, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण होते. ह्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने शरीराचा आकार समतोल राहतो.
 
काळे चणे गुळासोबत खाल्याने आपल्या शरीरात ऊर्जा मिळते. हिवाळ्यात हे खाणे फायदेशीर ठरतं. काळे चणे फायबरयुक्त असतात. पचनसंस्थेला सुरळीत करतात. रात्री चणे पाण्यात भिजवून सकाळी अनोशापोटी खाल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो. उरलेले पाणी पिऊन घेतल्याने शरीरास फायदेशीर ठरते. 
 
काळ्या हरभऱ्यात अँटिऑक्सिडंट्स, अँथोसायनिन, फायटोन्यूट्रिएंट्स आणि एएलए भरपूर असतात. जे हृदय रोगाला दूर करून रक्तवाहिन्यांना शुद्ध आणि निरोगी ठेवतं. फॉलेट आणि मॅग्नेशिअम ह्याचे स्रोत आहे. ज्यामुळे हृदयविकारांच्या झटक्या आणि स्ट्रोकच्या धोक्यापासून बचाव होतो. 
 
मधुमेह आणि कोलेस्टेरॉल :- 
मधुमेह आणि कोलेस्टेरॉल याला नियंत्रित करण्यास मदत करतात.
मधुमेहाच्या रुग्णांना काळ्या चण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरतं. 
यात आढळणारे कर्बोदके लवकर पचून जातात जेणे करून रक्तातील साखरेची पातळी कमी होते. 
तसेच टाईप 2 मधुमेहाच्या धोक्यालाही दूर करते. 
काळ्या चण्यांमध्ये विरघळणारे तंतू (फायबर) असल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Eye Donation Day : मृत्यूनंतर देखील आपण हे सुंदर जग बघू शकता