Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॅल्शियम आणि आयरन एकत्र घेऊ नये, कारण जाणून घ्या

कॅल्शियम आणि आयरन एकत्र घेऊ नये, कारण जाणून घ्या
, मंगळवार, 8 डिसेंबर 2020 (08:41 IST)
सध्याच्या काळात शरीरात कॅल्शियम आणि आयरनची कमी होणं सामान्य बाब आहे. याच्या कमतरतेमुळे लोकांना अशक्तपणा, कमकुवत हाडं, थकवा आणि ऑस्टियोपोरोसिस सारखे आजार आढळत आहे. डॉक्टरांच्या मते आपल्या शरीरातील लहान आतड्याच्या एका भागात आयरन साचतो. इथून त्याला रक्तप्रवाहात पोहोचण्याचे काम इंट्रोसाईट्स नावाच्या पेशी करतात. 
 
आपण जे खातो त्यामधून आयरन पूर्णपणे आपल्या शरीरास मिळतं नाही त्यामुळे शरीरात आयरन ची कमतरता होते. या शिवाय जे लोक आपल्या आहारात आयरन कमी प्रमाणात घेतात त्यांच्या शरीरात देखील आयरनची कमतरता होते. तसेच शरीरात कॅल्शियमची कमतरता झाल्यामुळे हाडे कमकुवत होतात अशा परिस्थितीत हाडं मोडण्याची किंवा फ्रॅक्चर होण्याची समस्या उद्भवू शकते.

डॉक्टरांच्या मते शरीरात आयरन आणि कॅल्शियमच्या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या आहारात काही अन्नाचा समावेश देखील करू शकता या शिवाय डॉक्टर अनेक प्रकाराचे पूरक आहार घेण्याच्या सल्ला देखील देतात. 
 
आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की आपल्याला आयरन आणि कॅल्शियम एकत्र घ्यावयाचे नाही. हे दोन्ही एकत्ररित्या खाल्ल्याने आपल्या शरीरास नुकसान देऊ शकतात. आज आम्ही आपल्याला या बद्दलची माहिती देत आहोत की कॅल्शियम आणि आयरन एकत्र का घेऊ नये. 
 
कॅल्शियम आणि आयरन ची कमतरता झाली असल्यास काय करावं -
तज्ज्ञांच्या मते, आयरनचे पूरक आहार जेवण्याबरोबर घेऊ नये. जर आपण आयरनचे पूरक आहार घेऊ इच्छित आहात तर ते जेवण्याच्या एका तासा पूर्वी किंवा नंतर घ्यावे. एका ठराविक वेळेलाच कॅल्शियम पूरक आहार घ्यावे. तसेच गरोदर बायकांना कॅल्शियम आणि आयरन ची गोळी कधीही अनोश्यापोटी घेण्याचा सल्ला दिला जात नाही. 
 
आयरन आणि कॅल्शियमची गोळी एकत्र खाऊ नये. 
आयरन आणि कॅल्शियम ची गोळी कधीही डॉक्टरांच्या सल्ला शिवाय घेऊ नये. तसेच या दोन्ही गोळ्या एकत्ररित्या घेऊ नये. या दोन्ही गोळ्या घेण्याच्या मध्ये सुमारे 1 तासाचा अंतर ठेवावा. 
 
डॉक्टरांच्या मते, आयरन आणि कॅल्शियम एकत्र घेतल्यावर शरीरात आयरन च्या शोषण करण्याच्या प्रक्रियेत कॅल्शियम प्रतिबंध करते. आपण जेवण्याच्या अर्धा तासा नंतर आयरन च्या गोळीचे सेवन करू शकता. या शिवाय हे देखील लक्षात ठेवा की आयरनच्या गोळीचे सेवन केल्या नंतर लगेच दूध किंवा दुधाचे पदार्थ घेऊ नका. नाही तर या मुळे आपल्याला काही त्रास होऊ शकतो.
 
चिकित्सकांच्या म्हणण्यानुसार दुधात कॅल्शियम असतं, म्हणून जर आपण आयरन च्या गोळ्यासह दुधाचे सेवन करता तर शोषणात अडथळा येतो. असेच कॅल्शियमच्या गोळ्यांचे देखील आहे ते देखील आयरन च्या शोषणात अडथळा आणतात. म्हणून या दोन्ही गोळ्यांना घेण्याच्या वेळेत काही अंतर राखायला हवा.
 
आपल्याला माहितीसाठी सांगू इच्छितो की आयरनच्या गोळ्या खाल्ल्याने आपल्याला बद्धकोष्ठता, अतिसार, किंवा पोटाशी संबंधित इतर त्रास देखील होणं सामान्य आहे. याच्या सेवनाने आपल्या शौचाचा किंवा मळाचा रंग देखील काळा होतो. अशा परिस्थितीत घाबरण्याची गरज नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपल्याच माणसांनी फसवाव, ह्यापेक्षा दुःख ते काय?