एलोवेराचा उपयोग हजारो वर्षांपासून सौंदर्यासाठीहोत आला आहे. पण, आरोग्यासाठी एलोवेरा तेवढेच फायदेशीर आहे, जेवढे की त्वचेसाठी. एलोवेरा अनेक गंभीर आजार दूर ठेवण्यास मदत करते. तर चला आज जाणून घेऊया एलोवेरा ज्यूस आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे.
बद्धकोष्ठता पासून अराम-
एलोवेरा जूस मध्ये अनेक औषधीय गन आहेत, जे बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी मदत करतात. सोबत ज्या लोकांना पाचन संबंधित समस्या असतात. त्यांनी एलोवेरा जूस नक्की सेवन केल्यास फायदा मिळेल
हार्टबर्न पासून अराम-
उन्हाळ्यामध्ये हार्टबर्न आणि एसिड रिफ्लक्सची समस्या अधिक पाहण्यास मिळते. पण, एलोवेरा जूस या साइड इफेक्टच्या या समस्यांना दूर करण्यासाठी मदत करते.
इरिटेबल बोवेल सिंड्रोम
एलोवेरा जूस इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) वर उपायांमध्ये मदतगार सिद्ध होते. या समस्येमध्ये आतड्यांना सूज येते. ज्यामुळे दुखणे वाढते. एलोवेरा जूस यावर रामबाण उपाय सिद्ध होतो.
वजन ठेवते नियंत्रित-
विटामिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सीडेंटने भरपूर एलोवेरा जूस भूख नियंत्रित ठेवते, ज्यामुळे वजन कमी होते.
शरीराला करते डिटॉक्स-
एलोवेरा जूस शरीरामधील विषाक्त पदार्थ बाहेर काढते आणि शरीराची आतून स्वच्छता करते. सोबतच यामध्ये असलेले तत्व रोगप्रतिकात्मक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
ब्लड शुगर नियंत्रित-
एलोवेरा जूस मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर आहे. सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास मधुमेह आणि हाइपरलिपिडिमियाच्या रुग्णांमध्ये रक्त शर्कराला नियंत्रित आणि लिपिड ला कमी करण्यास मदत करते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik