Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपल्या शरीरातच आहे कोरोनाचे औषध महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

आपल्या शरीरातच आहे कोरोनाचे औषध महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
, रविवार, 23 मे 2021 (13:27 IST)
कोरोनाव्हायरसपासून मुक्त होण्यासाठी सर्वोपरीने प्रयत्न सुरू आहेत. या विषाणूपासून आराम मिळण्यासाठी सध्या कोणतेही प्रभावी उपचार आढळले नाहीत. परंतु तज्ञ, डॉक्टर या विषाणूचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याचा  सल्ला देत आहेत .जर आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर व्हायरस आपल्यावर हल्ला करू शकत नाही, म्हणजेच आपल्या शरीरात या विषाणूचा पराभव करण्याची शक्ती आहे. परंतु आपण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आपल्या दिनचर्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत याबद्दल आपल्याला पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे, आणि त्या गोष्टींचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत असलेल्या कोणत्या गोष्टी आहेत?जाणून घेऊ या. 
 
सर्वप्रथम जाणून घ्या की  प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी कोणत्या गोष्टी वापरु शकता?
 
1 नियमित योगाभ्यास -शरीराला आतून मजबूत ठेवण्यासाठी नियमित योगाभ्यास आवश्यक आहे. आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी शारीरिक व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे.
 
2 शारीरिक क्रियाकलांप - शारीरिक  क्रियाकलापांकडे अधिक लक्ष द्या. शारीरिक क्रियाकलापांद्वारे आपण सक्रिय रहाल आणि आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढेल. यासाठी, आपण खेळांचा समावेश करू शकता जेणेकरून शरीराचा व्यायाम होईल आणि मानसिकदृष्ट्या ताजे वाटेल.
 
3 बाहेरचे खाऊ नका- घरात बनविलेले सात्विक अन्न खावे. विषाणू  पासून वाचण्यासाठी स्वतःवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या साठी आपण हा बदल आपल्या दैनंदिनीमध्ये समाविष्ट करा आणि घरातच बनलेले शुद्ध आणि सात्विक अन्न खावे.
 
4 व्हिटॅमिन सीचे सेवन-रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी घ्या. यासाठी आवळ्याचे सेवन करा. 
 
5 फळे आणि हिरव्या भाज्या- आपल्या आहारात फळांचा समावेश करा. हिरव्या भाज्या खा. हे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत करेल आणि कोणत्याही विषाणूंविरूद्ध लढण्याची शक्ती देईल.
 
6 तुळशीचे सेवन-रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुळस खावी .  दररोज तुळस अनोश्या पोटी खाऊ शकता.
 
 
आता कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्याचे सेवन करून प्रतिकारक शक्ती कमी होते-
 
* मैद्याच्या पदार्थांचे सेवन करू नका. 
* साखरेचे सेवन करू नका. या ऐवजी गूळ वापरा.
* कोल्डड्रींक्स चे सेवन करत असाल तर कोल्डड्रिंक पिऊ नका. 
* जंक फूड खाऊ नका.
* पॅक्ड गोष्टी खाऊ नका.
 
कोरोनाव्हायरसशी सामना करण्यासाठी आपल्या आहारात आणि आपल्या जीवनशैलीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केल्याने  या विषाणूचे स्वतःवर वर्चस्व होण्यापासून रोखले जाऊ शकते. आता बदल करण्याची वेळ आली आहे. कोरोना कालावधीतील बदल केल्याने  आणि समजूतदारीने उचललेली पावले आपल्याला निरोगी आयुष्याकडे नेतील, म्हणून या विषाणूची भीती बाळगू नका, तर स्वत: ला बळकट करा आणि या विषाणूचा पराभव करा.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लसीकरणानंतर या विशेष गोष्टी आपल्या आहारात समाविष्ट कराव्यात