Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

CoronaVirus : कोरोना काळात घरात पाहुणे येत असल्यास, या गोष्टींची काळजी घ्यावी

CoronaVirus : कोरोना काळात घरात पाहुणे येत असल्यास, या गोष्टींची काळजी घ्यावी
, शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (11:21 IST)
कोरोना विषाणूंची भीती सर्वत्र व्याप्त आहे. काही लोकांनी या भीतीपोटी राखीचा सण देखील साजरा केलेला नाही तसेच इतर सण उत्सव देखील मंदावले आहे. आता येणारा काळात एकामागून एक सण येणार आहे. तसेच आपल्याला आपल्या प्रियजनांशी भेटावेसे वाटत असणारच, कारण लॉक डाऊनमुळे आपण बऱ्याच दिवसापासून कोणाला भेटलेले नाही.
 
तर मग, आपण येथे जाणून घेऊ या की कोरोनाच्या संसर्गाच्या दरम्यान आपण पूर्ण संरक्षणासह उत्सव कसा साजरा कसा करू शकता ? तसेच निश्चिंतपणे आयुष्य कसे जगू शकतो ?
 
कोरोना विषाणूमुळे, प्रत्येक व्यक्तीच्या मनात भीती आहे की तो कोरोनाचा बळी तर पडणार नाही. त्याच वेळी सण सुरू झाले आहेत, अश्या वेळी जे लोकं एकमेकांना भेटू शकले नाही, ते आपल्या नातेवाइकांना भेटायला जाण्याचा विचार करीत आहे, कारण लॉक डाऊनमुळे ते बराच काळ भेटू शकले नाही. पण जेव्हा आपण एखाद्याला भेटावयास जाता तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे, कारणं सुरक्षितता आणि सावधगिरीमुळे कोरोना पासून वाचणं शक्य आहे.
 
चला इथे जाणून घेऊ या की कोरोना संसर्गाच्या दरम्यान आपण पूर्ण सुरक्षिततेसह आपल्या प्रियजनांना कशी भेट देऊ शकतो ?
 
जर आपण एखाद्या नातेवाइकांकडे जाण्याचा विचार करीत असल्यास सर्वात पहिले कोविड -19 ची चाचणी करवावी. नंतर कुठेही जाण्याचा विचार करावा किंवा कोणी आपल्या घरी येत असल्यास तरीही हा नियम लागू होणार.
 
जर आपण एखाद्याचा घरी जात असल्यास किंवा कोणी आपल्या घरी येत असेल तेव्हा आपण गरम किंवा कोमट पाणी प्यावं. थंड गोष्टींपासून लांबच राहावं. जेव्हा आपण गरम पाण्याचे सेवन करता आणि वाटेत एखाद्या प्रकारच्या विषाणूंच्या संपर्कात आला असाल तर गरम पाण्याच्या मदतीने हा धोका कमी होऊ शकतो.
 
सामाजिक अंतराच्या नियमांचे अनुसरणं करावं. कोणाजवळ बसून बोलू नका. त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवूनच बोला.
 
घरात एखाद्या खोलीत बोलण्या ऐवजी आपण टेरेस किंवा अंगणा सारख्या मोकळ्या जागेत बसून बोलू शकता.
 
मास्कचा वापर जरूर करावा. असा विचार करू नका की आपण घरातच आहो तर मास्क का लावायचा ? असे विचार करू नका आणि मास्कचा वापर जरूर करा. आणि आपल्या सह सर्वांनी मास्क वापरले आहेत याची खबरदारी घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नारळाचे तेल फक्त केसांसाठी नव्हे, एकदा हे देखील करून बघा...