Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कोरोना असू शकतं

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, कोरोना असू शकतं

वृजेंद्र सिंह झाला

, बुधवार, 27 मे 2020 (17:00 IST)
कोविड 19 म्हणजेच कोरोनाची तीव्रतेला या वरून समजता येईल की सध्या भारतात तब्बल 1 लाख 25 हजाराहून जास्त लोकांना या संसर्गाची लागण लागली असून तब्बल 
 
3 हजार 500 हून जास्त लोकं मरण पावले आहेत. म्हणूनच या साथीच्या आजाराकडे दुर्लक्ष करणे स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी घातक ठरू शकतं. म्हणूनच या आजाराला लपवू नका. काही ही लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या रुग्णालयात जावं किंवा डॉक्टरांशी संपर्क साधावा.
 
इंदूरच्या कोवीड -19 रुग्णालय चोइथरामच्या ICU आणि क्रिटिकल केयर (अतिदक्षता) विभागाध्यक्ष आणि चीफ कन्सल्टन्ट इंटेसिव्हिस्ट डॉ.आनंद सांघी यांनी वेबदुनियाशी 
 
विशेष संवाद साधताना सांगितले की कोरोना विषाणूचे चक्र 21 दिवसाचे असतं. हा आजार एका व्यक्तीपासून दुसर्‍याला पसरतो यात कुठलीही शंका नाही. परंतु या आजाराला घाबरण्याची अजिबात गरज नाही. गरज आहे तर वेळेत औषधोपचार करण्याची.
 
डॉ. सांघी म्हणाले की एखाद्या व्यक्तीला ताप आल्यास त्याला स्वतःला घरातील सर्व सदस्यांपासून वेगळं करायला हवं. कारण बऱ्याच वेळा असेही होत की व्यक्ती तापाचे 
 
औषध घेऊन बरे ही होते. पण अश्या स्थितीत ते कोरोना करियर बनू शकतात. म्हणजेच हे आजार इतर लोकांमध्ये पसरू शकतं. ते म्हणाले की कुटुंबातील एका पेक्षा जास्त लोकांना ताप असल्यास तातडीने रुग्णालयात संपर्क साधायला हवा.
 
कोविड रुग्णांमध्ये राहून त्याच्यावर उपचार करत असलेले डॉ. सांघी सांगतात की अशी अनेक लक्षणे आहे जे कोरोनाचे असू शकतात. या व्यतिरिक्त काही असे लक्षणे असू शकतात जी सामान्य लक्षणांपेक्षा वेगळे असू शकतात. त्यांना हलक्यामध्ये घेऊ नये.
 
काय आहे कोरोनाची लक्षणे चला जाणून घेऊया.....
सामान्य लक्षणे-
ताप : ताप येत असल्यास मुळीच दुर्लक्ष करू नये. हलका ताप येत असल्यास स्वतःला कुटुंबापासून वेगळं करावं. नाही तर हे इतरांना ही लागू शकतं.
कोरडा खोकला
अंगदुखी
डोकेदुखी
अंग मोडणे
श्वास घ्यायला त्रास होणं
 
सामान्य लक्षणांपेक्षा वेगळी लक्षणे-
छातीत जळजळ होऊन वेदना
गंध येण्याची शक्ती कमी होणे
चव कमी येणे
अतिसार होणे 
 
डॉ. सांघी म्हणतात की वरीलपैकी कोणतेही लक्षणे दिसल्यास त्यांना दुर्लक्ष करू नका. कारण रुग्ण या आजाराच्या पहिल्या टप्प्यातच डॉ. कडे गेल्यास उपचार करायला सोपं जातं. नाही तर वेळ झाल्यास नैसर्गिकरीत्या रुग्णांच्या अडचणी वाढू लागतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उन्हाळ्याचा खरा मित्र गुलकंद, हे 5 फायदे आपल्याला फार कामी येतील