Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हृदय मजबूत ठेवायचं असेल तर रामबाण आहे केळी

Banana
, मंगळवार, 14 मार्च 2023 (17:06 IST)
लोकांना निरोगी राहण्यासाठी फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. फळांमुळे शरीराचे पोषण होते. फळांमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे यांसह भरपूर पोषण असते. जर तुम्हाला निरोगी राहण्यासाठी फायदेशीर फळाचे सेवन करायचे असेल तर केळी देखील फायदेशीर ठरू शकतं. तज्ञ दररोज एक केळी खाण्याची शिफारस करतात. केळीमध्ये जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात. केळीमध्ये आढळणारे कर्बोदके, जीवनसत्त्वे A, C आणि B-6, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, सोडियम, पोटॅशियम शरीराला संपूर्ण पोषण प्रदान करतात. याव्यतिरिक्त नैसर्गिक शर्करा जसे की सुक्रोज, फ्रक्टोज आणि ग्लुकोज आढळतात. केळीला सुपरफूड म्हणता येईल. पण केळी खाण्याचे काही तोटेही आहेत. तर चला जाणून घेऊया केळी खाण्याचे फायदे आणि तोटे -
 
केळीचे खाण्याचे फायदे
केळ्यामध्ये पोटॅशियम असते, वर्कआऊटनंतर केळी नियमित खाणे फायदेशीर ठरू शकते.
केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 आढळते, जे मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे आणि त्याच्या सेवनाने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते.
केळी वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
केळीमुळे बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
केळीमध्ये अमिनो अॅसिडचे प्रमाण जास्त असल्याने हार्मोन्सची पातळी योग्य राहते आणि मूड चांगला राहतो. यामुळे तणाव कमी होतो.
केळी हृदयाच्या आजारांपासून संरक्षण करते.
 
केळी खाण्याचे तोटे
केळीमध्ये कॅलरीज खूप जास्त असतात, ज्यामुळे वजन वाढू शकतं. म्हणूनच ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी केळी खाणे टाळावे.
केळीमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असते, त्यामुळे याच्या सेवनाने स्नायू कमकुवत होऊ शकतात.
केळीमध्ये आढळणाऱ्या फ्रक्टोजमुळे पोटात गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.
जर तुमची किडनी काम करत नसेल तर तुम्ही केळीचे सेवन कमी करावे. केळीमध्ये आढळणारे पोटॅशियम किडनीवर ताण आणते.
केळी खाल्ल्याने मधुमेह रुग्णाची साखर वाढू शकते
 
विशेष: वेबदुनिया प्रदान केलेली माहितीच्या संदर्भात कोणताही दावा करत नाही किंवा जबाबदारी घेत नाही. वरील लेखात नमूद केलेल्या संबंधित रोगाबद्दल अधिक तपशीलांसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उन्हाळ्यात घराची बाल्कनी या फुलांनी सजवा, खूप सुंदर दिसेल