Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गाढ झोप येण्यासाठी हे करा

गाढ झोप येण्यासाठी हे करा
आजच्या धावपळीच्या युगात निद्रानाश होणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे काही लोक झोप येण्यासाठी गोळ्यांचा आधार घेतात. त्याचे नकारात्मक परिणाम शरीरावर होताना दिसतात. त्यासाठी रात्रभर अंथरुणावर कूस बदलूनही झोप न येणार्‍या लोकांनी नैसर्गिक उपाय करावेत. या उपायांचा कसलाही नकारात्मक परिणाम शरीरावर होत नाही.

करा योग्य उशीची निवड - चांगली झोप आणि उशी यांचा घनिष्ठ संबंध आहे. उशी गळा आणि डोक्याला आधार देते तसेच पाठीचा मणकाही ताठ ठेवते. जर तुम्ही पोटावर झोपत असाल तर मऊ उशीचा वापर करा. जर एका कुशीवर झोपत असाल तर मध्यम नरम उशीची निवड करा. जर तुम्ही सरळ पाठीवर झोपत असाल तर उशी थोडी कडक असावी.

योग्य आहार - झोपण्यापूर्वी जास्त जेवण करू नये. जास्त जेवल्यास शरीराचे तापमान वाढते आणि झोपही येत नाही. याचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही कमी जेवण करावे. रात्रीच्या जेवणानंतर केळी खाणे चांगले राहील. केळीत ट्रिपटोफोन नावाचे अँमिनो अँसिड आढळून येते. हे आम्ल शरीरात सेरोटोनिन हार्मोनच्या उत्सर्जनासाठी सहाय्यभूत आहे. ते मेंदू आणि शरीर शांत करते. चहा-कॉफीचे सेवनही कमी करावे.

सप्लिमेंट्स घ्यावे - कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास झोपेची समस्या दूर होते. मॅग्नेशियम नैसर्गिक झोप आणणारे मिनरल मानले जाते. यामुळे तणाव कमी होण्यासही मदत मिळते. स्नायू आणि मेंदूचा तणावही कमी होतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळेसुद्धा झोपेची समस्या उद्भवते. दूध, ओट्स आणि अंजीरचे सेवन करावे.

प्रकाश कमी ठेवावा - रात्रीच्या वेळी तीव्र प्रकाश असल्यास झोप येत नाही. खरे तर कमी प्रकाशात मेलाटोनिन नावाच्या हार्मोनचा स्राव होतो. या हार्मोनमुळेच झोप येते. त्यामुळे रात्री झोपताना झिरो लाइट लावावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जाणून घ्या लोण्यातील विविधता?