Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ही औषधे घेता का?

ही औषधे घेता का?
ऐकीव माहितीच्या आधारे किंवा कोणी तरी सांगितले आहे म्हणून आपण काही औषधे घेतो. औषधे घेताना आपण डॉक्टरांचा सल्ला विचारत नाही. पण काही औषधांचे दुष्परिणाम असतात. इतकेच नाही, तर विशिष्ट प्रकारच्या औषधांमुळे व्यायाम करताना त्रास होऊ शकतो. व्यायामावर आणि तुमच्या सर्वांगीण आयुष्यावर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात. अशाच काही औषधांविषयी जाणून घेऊ या. 
 
*सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रियुप्टेक इनहिबिटर हे औषध नैराश्य आणि काळजीच्या लक्षणांसाठी दिले जाते. या श्रेणीतली औषधे घेणार्‍या व्यक्तीला भोवळ आल्यासारखे वाटते, तसच उर्जेची पातळी खालावते. अशा औषधांमुळे व्यायाम करताना तोंड कोरडे पडते. तसेच खूप घाम येतो. हे टाळण्यासाठी तुम्ही सतत पाणी प्यायला हवे. 
 
*बेंझोडायझेपाइन्स प्रकारची औषधे काळजी, चिंता तसेच एखाद्या गोष्टीची भीती वाटत असल्यास दिली जातात. या औषधांमुळे शांत वाटते. ही औषधे घेतल्यानंतर दमल्यासारखे आणि गळल्यासारखे वाटते. यामुळे शारीरिक क्षमता कमी होते आणि व्यायाम करावासा वाटत नाही.
 
*झोपेच्या गोळ्याही व्यायाम करताना तापदायक ठरतात. अशा गोळ्यांमुळे सतत आळस येतो, झोप येते. यामुळे व्यायामाच्या क्षमतेवर परिणाम होतो. 
 
*अ‍ॅलर्जीवर दिल्या जाणार्‍या औषधांमुळे खूप थकवा आल्यासारखे वाटते. या औषधांचा प्रभाव असेपर्यंत तुम्हाला सतत झोप, कंटाळा आल्यासारखे वाटते. अशा औषधांमुळे शरीराचे तापमान खूप वाढते. यामुळे खूप घाम येतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. 

* बद्धकोष्ठतेवर दिली जाणारी औषधेही दुष्परिणाम करू शकतात. अशी औषधे घेऊन व्यायाम केला तर पोटात गोळे येऊ शकतात. 
 
* स्टिम्युलंट्‌स मेंदूची क्षमता वाढवतात. या श्रेणीतल्या औषधांचे बरेच दुष्परिणाम असतात. यामुळे व्यायामाच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. हृदयाची धडधड वाढणे, रक्तदाब वाढणे अशा समस्या यामुळे निर्माण होऊ शकतात. 
 
* सर्दी, चोंदलेले नाक यावर दिली जाणारी औषधेही दुष्परिणाम करू शकतात. अशा औषधांमुळे हृदयगती, रक्तदाब वाढणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
 
कांचन रिद्धी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धूम्रपान सोडवण्यासाठी हे पदार्थ दररोज खा