Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आहारातूनच मिळवू शकता औषधं

आहारातूनच मिळवू शकता औषधं
, शनिवार, 23 मार्च 2019 (00:09 IST)
आजच्या काळात वाढणार्‍या आजाराचं मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकार क्षमतेचा अभाव. आपण छोट्याछोट्या दुखण्यांसाठी औषध-गोळ्यांचा मारा करत असतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास वावच मिळत नाही. रोजच्या आहारात रोगप्रतिकारक क्षमता वाढवणार्‍या पदार्थांचा समावेश केल्यास आपण डॉक्टरांच्या कडवट औषधांपासून दूर राहू शकतो.
 
रोज सकाळी भिजवलेले दोन बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमतेच्या वाढीबरोबरच ताणाचेही योग्य व्यवस्थापन करणे शक्य होते.
 
'क' जीवनसत्त्व असणार्‍या लिंबू, चिंच, संत्रे, मोसंबी, आवळा, अननस अशा फळांच्या सेवनामुळे रोगाचा प्रतिकार करणार्‍या पांढर्‍या रक्तपेशींची निर्मिती होते. यामुळे शरीरात कोणताही जंतू प्रवेश करू शकत नाही.
 
लसूण आणि पालेभाज्या यांचा आहारात अवश्य समावेश करावा. पालकामुळे पचनसंस्था सुधारते आणि कफाचा त्रास दूर होतो.
 
मशरूममध्ये असणार्‍या अँण्टीव्हायरल, अँण्टीट्यूमर, अँण्टीबॅक्टेरिअल तत्त्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते. यांचे नियमित सेवन आपल्याला आजारापासून दूर ठेवण्यास साहाय्यभूत ठरू शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ताप आल्यावर कपाळावर पट्ट्या ठेवाव्या की नाही?