Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Reduce Obesity भरपूर खा या 5 वस्तू, नाही वाढणार वजन

tomato
, मंगळवार, 28 फेब्रुवारी 2023 (22:08 IST)
लठ्ठपणा एक गंभीर समस्या आहे आणि यामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांसमोर ही समस्या नेहमीच असते की काय आणि किती खावे ज्याने वजन नियंत्रित राहावे. तर येथे आम्ही आपल्याला सांगू इच्छित आहोत की काही खाद्य पदार्थांमध्ये पाणी भरपूर प्रमाणात आढळतं आणि त्यात आवश्यक व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडेंट आणि इतर महत्त्वाचे पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. या खाद्य पदार्थांमुळे पोट भरलेलं वाटतं त्यामुळे इतर पदार्थांकडे दुर्लक्ष करणे सोपे होतं.
 
तर बघू असे खाद्य पदार्थ ज्याने पोटही भरतं आणि शरीरात कॅलरीज कमी प्रमाणात पोहचतात. या पाच खाद्य पदार्थांचा सेवन केल्याने वजन वाढतं नसतं.
 
टोमॅटो- टोमॅटो व्हिटॅमिन ए, सी, आणि बी 2 याने समृद्ध आहे. व्हिटॅमिनव्यतिरिक्त टोमॅटोमध्ये फोलेट, पोटॅशियम आणि फायबर सामील असतं. टोमॅटोमध्ये लाइकोपीन आढळतं ज्याने अनेक गंभीर आजारांपासून लढायला मदत होते.
webdunia
 ब्रोकोली- व्हिटॅमिन ए, सी आणि के आढळणारं ब्रोकोली कर्करोगावर मात करण्यात सक्षम असते.
 
फुलकोबी- यात अधिक प्रमाणात फायबर आढळतं. अनेक आजारांवर मात करण्यात सक्षम कोबी खाल्ल्याने वजन वाढत नसतं.
 
सेलेरी- फायबर सामुग्रीव्यतिरिक्त यात पाणी, पोटॅशियम, फोलेट आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आढळतं. या व्यतिरिक्त यात कॅलरीज कमी प्रमाणात असल्याने वजन वाढण्याचा प्रश्न उद्भवतच नाही.
webdunia
काकडी- काकडीत पाण्याचे प्रमाण अधिक आणि कॅलरी प्रमाण अगदी नगण्य असल्यामुळे आपण कधीही आणि कितीही काकडी खाऊ शकता. याने वजन मुळीच वाढत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Marathi Essay : 10 lines on save water जलसंधारणावर 10 ओळींचा निबंध मराठीत