Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वजन कमी करण्यासाठी बडीशेप या चार प्रकारे दररोज खा, महिन्याभरात परिणाम दिसेल

वजन कमी करण्यासाठी बडीशेप या चार प्रकारे दररोज खा, महिन्याभरात परिणाम दिसेल
, शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (20:21 IST)
वजन कमी करण्यासाठी प्रत्येक जण काही न काही उपाय अवलंबवत असतो. तरी ही वजन काही कमी होत नाही. आपल्या स्वयंपाकघरात अशा काही गोष्टी आहेत ज्या पौष्टिक असण्यापेक्षा वजन कमी करण्यासाठी अधिक प्रभावी मानल्या जातात. बडीशेप देखील त्यापैकी एक आहे. बडीशेपमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सेलेनियम, लोह, फायबर यांसारखे पोषक घटक आढळतात. नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
 
बडीशेप चहा प्यायल्याने वजनही झपाट्याने कमी होते. बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यासोबतच चेहऱ्यावर चमकही येते. बडीशेपचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होते. अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असल्याने, ते शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणाव देखील कमी करते, ज्यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा सारख्या परिस्थिती उद्भवू शकतात. बडीशेप चार प्रकारे सेवन केल्याने वजन झपाट्याने 
कमी होते. 
 
1 बडीशेप पावडर -मूठभर बडीशेप घेऊन त्याला चांगली बारीक करून पावडर बनवा. बडीशेप पावडरचा वापर 'चुरण' बनवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो, ज्यामध्ये मेथीचे दाणे, काळे मीठ, हिंग आणि खडी साखर यांसारखे घटक चव आणि चांगले पचन गुणधर्मसाठी मिसळू शकता. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. वजन कमी करण्यासोबतच यामुळे चेहरा ही चमकदार होतो.
 
2 बडीशेप पाणी- बडीशेप पाण्यासोबत सेवन केल्याने पोटातील मुरडा कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते. मूठभर बडीशेप घ्या आणि एका ग्लास पाण्यात भिजवा. रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी हे पाणी प्या. हे शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांचे शोषण वाढवते आणि त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. सकाळ संध्याकाळ एक ग्लास बडीशेप पाणी प्यायल्याने वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
 
3 बडीशेप चहा- हा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. बडीशेप चहा बनवण्यासाठी, चहाला पाणी उकळत असताना एक चमचे बडीशेप घाला. शिवाय बडीशेप घालताना अर्धा चमचा गूळ घाला. बडीशेप चहामध्ये कधीही साखर घालू नये हे लक्षात ठेवा. 
 
4 भाजलेली बडीशेप- एक चमचा बडीशेप घेऊन मंद आचेवर परतून घ्या. चवीसाठी त्यात थोडी खाडी साखर घाला आणि जेवणानंतर माऊथ फ्रेशनर म्हणून दररोज खा. त्यामुळे गोड खाण्याची इच्छा होत नाही, त्यामुळे ते आपल्यासाठी ही खूप फायदेशीर आहे. आपण भाजलेली बडीशेप बारीक करून पावडर बनवून दर रोज सेवन करू शकता.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Kiss Day : एक नवी कळी गालावर हळुवार उमलते!