Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा

या 4 पदार्थांचे सेवन करा आणि उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवा
, बुधवार, 24 मे 2023 (15:01 IST)
आपण आपले वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतच असाल पण फायदा होत नसेल तर या 5 गोष्टींचे फायदे जाणून घ्या आणि उन्हाळ्यात आपले वजन सहजरित्या कमी करा. 
 
1 दही- उन्हाळ्यात दही आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे फक्त पोषणच करीत नाही तर शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करंत आणि वजन वाढविण्यास प्रतिबंधित करते. ह्याचा सेवनाने आपले पोट पण भरलेले राहते जेणे करून आपण जास्त खाणे टाळाल.
 
2 ताक - ताक वापरल्याने शरीराचा बांधा सडपातळ राहतो. आपण ताकामध्ये मसाले घालून देखील पिऊ शकता किंवा भाज्यांबरोबर देखील खाऊ शकता.
 
3  दुधी - उन्हाळ्यात दुधी, गिलकी, सारख्या भाज्या फायदेशीर असतात. ह्या भाज्या खाल्ल्याने आपले वजन वाढत नाही त्याच बरोबर पचण्यास हलकं असल्याने फायदेशीर असतात.
 
4 लिंबू - उन्हाळ्यात लिंबूपाणी खूप घेतले जातं. लिंबूपाणी शरीरास ऊर्जातर देतंच गळ्याला ओलावा देतो आणि वजन कमी करण्यात अत्यंत फायदेशीर आहे.

व्यायाम - दररोज नियमाने व्यायाम केलेच पाहिजे. दर रोजच्या दैनंदिनीमध्ये योगाचा समावेश करावा. योग केल्याने मन आणि मेंदू शांत राहते. शरीर पण तंदुरुस्त राहत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

DFCCIL recruitment 2023: DFCCIL मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी