शरीर आकर्षक आणि फिट दिसावं यासाठी सोपे उपाय

सोमवार, 6 एप्रिल 2020 (13:15 IST)
केवळ जीवनशैलीत काही लहानसे परिवर्तन करून आपण शरीर आकर्षक बनवू शकतात. 
 
नाश्ता
शोधांप्रमाणे सकाळी अती प्रमाणात नाश्ता घेतल्याने मधुमेह आणि लठ्ठपणा वाढतो. अशात स्वस्थ ब्रेकफास्टचा पर्याय निवडून आपण यापासून वाचू शकता अर्थात नाश्ता पौष्टिक असावा परंतू लवकर पचणारा ज्याने आपल्याला लंचपर्यंत भूक देखील लागेल.
 
पाण्याचं संतुलन
जंक फूड खाणार्‍या तहान कमी भासते परंतू आरोग्यासाठी योग्य प्रमाणात पाणी आवश्यक आहे. एका निरोगी माणसाला प्रत्येक 30 मिनिटाला एक घुट पाण्याचा घ्यायलाच हवे.
 
फिटनेस
आजच्या काळात फिटनेससाठी अनेक साधन उपलब्ध आहे. आपण जिम ज्वाईन करू शकता. या व्यतिरिक्त सर्वात उत्तम व्यायाम म्हणजे पायी चालणे. आपण दररोज किती कॅलरी कमी करत आहात या कडे लक्ष देणे आवश्यक आहे. 
 
आनंद
कोणत्याही प्रकाराचा मैदानी खेळ आपल्यासाठी योग्य ठरेल. याने शरीर तर फिट राहीलच मानसिक आनंद देखील प्राप्त होईल. कारण मित्रांसोबत खेळण्याने दोन्ही फायदे सोबत मिळतील.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख परफॉर्मेंस सुधारण्यासाठी डार्क चॉकलेट, तुम्ही व्हाल उत्तम प्रेमी