योग केल्यानं शरीर निरोगी राहतं. या सह योग मानसिक आजारांना दूर करण्यास मदत करतं. दररोज योगाच्या सराव नकारात्मक विचार आणि त्रासातून मुक्त होण्यास मदत करतं. या मुळे आपण बऱ्याच मानसिक आजारापासून आणि उच्च रक्तदाब आणि हृदयरोगापासून वाचता. जर आपण चांगल्या आरोग्यासाठी योग करतं आहात तर आपल्या योगामध्ये या 4 गोष्टींचा समावेश आवर्जून केला पाहिजे. त्याचे फायदे दुप्पट मिळतील.
* सकाळी ध्यान करा -
बरेचशे योगी सकाळी ध्यान करायला कधीही विसरत नाही, त्यांचे असे म्हणणे आहे की ध्यान केल्यानं मानसिक व्याधींना दूर करण्यास मदत मिळेल आणि या मुळे आपल्या दिवसभराच्या क्रियेसाठी एक हेतू निश्चित केला जाऊ शकतो. रात्री झोपण्यापूर्वी गजर लावावा आणि सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठाव. असं केल्यानं आपण स्वतःसाठी पुरेसा वेळ देऊ शकाल आणि आयुर्वेदानुसार आपले संपूर्ण दिवस ऊर्जेने भरलेले राहील.
* मंत्र उच्चार करणं-
आपण सकाळच्या ध्यान सत्रासाठी एक मंत्र निवडा ज्याचे उच्चारण केल्याने आपल्या मनाला शांतता मिळते. जेणे करून आपण संपूर्ण दिवसाचा हेतू निश्चित करू शकता. शांती मंत्र शांतीसाठी जपणे आणि गायत्रीमंत्र देखील आपण निवडू शकता. जे सूर्यप्रकाशाला आमंत्रित करतं आणि आपल्या दुःखाला कमी करण्यास आपली मदत करतं.
* स्वच्छ हवा घेण्यासाठी बाहेर जावं -
सतर्कता आणि एकाग्रतेला वाढवून आपला सराव करण्यापूर्वी निसर्गाच्या सानिध्यात फिरावं. असे केल्यानं आपल्याला शांती मिळेल. संशोधनात असे दिसून आले आहे की घराच्या बाहेर वेळ घालवण्यानं चैतन्य वाढतं, एंडोर्फिन रसायने उत्सर्जित होतात आणि तणाव कमी होतो.
* उत्साह आणणारी न्याहारी घ्यावी -
जर आपण आपल्या योगाभ्यासातून अधिकाधिक फायदा घेऊ इच्छित आहात, तर पौष्टिक न्याहारी घेणं आवश्यक आहे. निरोगी पर्यायांमधे ताजी फळे, आणि ग्रॅनोला, हिरवे स्मूदी, किंवा चिया सीड्स न्याहारीत दह्यासह घेऊ शकता. आपण आपल्या सकाळच्या चहा किंवा लिंबू पाण्यासह दिवसाला ताजेतवाने बनवू शकता. आपण आपली पाण्याची बाटली नेहमी बरोबर ठेवा.