rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणे खूप महत्वाचे आहे, या टिप्स अवलंबवा

sleep
, शनिवार, 14 जून 2025 (22:30 IST)
रात्रीच्या चांगल्या झोपेत अनेक घटक अडथळा आणू शकतात. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मोबाईल-टीव्हीचा जास्त वापर आणि अनेक आजार झोपेवर परिणाम करतात.चांगली झोप झाली नसेल तर दिवसभर अस्वस्थता जाणवते. चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप घेणे महत्त्वाचे आहे. चांगली झोप येण्यासाठी काही टिप्स अवलंबवा .चला जाणून घेऊ या.
स्वच्छ बेड
जे लोक दररोज त्यांचे बेड स्वच्छ करतात त्यांना चांगली झोप लागण्याची आणि त्यांचे आरोग्य चांगले राहण्याची शक्यता 19 टक्के जास्त असते.घाणेरड्या खोलीत झोपल्याने चिंता वाढते.
 
स्वच्छ चादर घाला 
दर आठवड्यात उशांचे कव्हर, चादरी धुवून घ्या.तुम्हाला दमा, एक्जिमा किंवा धुळीच्या कणांची ऍलर्जी असेल तर याची विशेष काळजी घ्या. यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल.
 
मोबाईल फोन वापरू नका.
संशोधनातून असे आढळून आले आहे की झोपण्यापूर्वी निळ्या प्रकाशाच्या संपर्कात आल्याने तुमची झोप बिघडते. म्हणून, झोपण्यापूर्वी सुमारे एक ते दीड तास मोबाईल फोन आणि लॅपटॉपपासून दूर रहा.
दिवसा कमी झोपा
दिवसा जास्त झोप घेतल्याने रात्रीच्या झोपेत अडथळा येऊ शकतो, म्हणून जर तुम्हाला दिवसा आळस किंवा झोप येत असेल तर एका तासापेक्षा जास्त झोपू नका. असं केल्याने तुम्हाला रात्री चांगली झोप येईल. 
शारीरिक हालचाली वाढवा:
दररोज शारीरिक हालचाली केल्याने चांगली झोप येऊ शकते. परंतु झोपण्यापूर्वी जड हालचाली टाळा हे लक्षात ठेवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इतिहासातील आदर्श पुत्र-पिता जोड्या