उन्हाळ्यात द्राक्षे खूप आवडीने खालले जातात .हिरवे द्राक्षांशिवाय काळे द्राक्ष देखील खूप चविष्ट असतात.याचे आरोग्यदायी फायदे माहिती झाल्यावर आपण हे खायला सुरु कराल. चला तर मग जाणून घेऊ या.
1 काळे द्राक्ष अल्झायमरच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे. त्यामध्ये उपस्थित रेस्व्हेरट्रॉल नावाचा घटक अल्झायमरशी लढायला खूप प्रभावी आहे, तसेच न्यूरो डीजेनेरेटिव रोगामध्ये देखील ही हे खूप फायदेशीर आहे.
2 द्राक्षाच्या लहान दाण्यांमध्ये पॉली-फेनॉलिक फायटोकेमिकल कंपाउंड आढळतात. हे अँटी ऑक्सीडेन्ट शरीराला कर्करोगाशीच नव्हे तर कोरोनरी हृदयरोग ,मज्जा तंतू रोग,अल्झायमर आणि व्हायरल संसर्गाशी लढण्याची क्षमता देतात.
3 काळ्या द्राक्षात फ्लेव्होनाईड्सच्या व्यतिरिक्त असे अनेक घटक आहेत जे हृदय रोगांशी लढायला उपयुक्त ठरतात.या व्यतिरिक्त त्यात असलेले अँटीऑक्सीडेंट हृदयरोगाचा झटका,रक्त साकळणे आणि उच्च कोलेस्ट्रॉल सारख्या समस्यांशी लढण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात.
4 द्राक्षांमध्ये मर्यादित प्रमाणात कॅलरी, प्रथिने, कार्बोहायड्रेट, चरबी, सोडियम, फायबर, जीवनसत्त्वे ए, सी, ई आणि के, कॅल्शियम, कॉपर, मॅग्नेशियम, मॅंगनीज, झिंक आणि आयरन आढळतात.
5 वजन वाढण्याच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर काळे द्राक्ष आपल्या समस्येचे समाधान करू शकते.हे रक्तात कोलेस्टेरॉल तयार होण्यास प्रतिबंध करते आणि लठ्ठपणाशिवाय इतर आरोग्याच्या समस्यांना प्रतिबंधित करते.
6 शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव झाल्यास, एक ग्लास द्राक्षाच्या रसामध्ये दोन चमचे मध मिसळून प्यायल्याने रक्ताची कमतरता पूर्ण होते जे रक्तस्त्रावामुळे कमी झाले आहे.
7 शरीरात यूरिक ऍसिड ची पातळी जास्त असेल तर काळ्या द्राक्षाचे सेवन फायदेशीर ठरेल. हे शरीरातील यूरिक ऍसिडची वाढलेली पातळी कमी करतं, ज्यामुळे किडनीवरचा भार वाढत नाही आणि किडनी देखील निरोगी राहते.
8 द्राक्षाचे गर ग्लुकोज आणि साखरेने समृद्ध असते.या मध्ये व्हिटॅमिन ए मुबलक असल्याने भूक वाढते,पचन शक्ती सुधारते,केस डोळे,आणि त्वचा चमकदार होते.
9 कर्करोगाच्या बचावासाठी काळे द्राक्षाचे सेवन करावे.विशेषतः त्वचेचा कर्करोग टाळण्यासाठी याचे सेवन करणे एक प्रभावी पर्याय आहे.
10 द्राक्षे मुरूम,पुळ्या,पुटकुळ्या,उकळणे आणि मुरुमं कोरडे करण्यास मदत करतात.द्राक्षाच्या रसाचे गुळणे केल्याने तोंडाचे छाले आणि जखमा बऱ्या होतात.
11 हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी, काळ्या द्राक्षाचा रस घेणं एस्प्रिनच्या गोळ्याइतकाच प्रभावी आहे.एस्प्रिन ची गोळी रक्त साकळू देत नाही.काळ्या द्राक्षाच्या रसात फ्लेव्होनॉइड्स नावाचं घटक असतो जे रक्त साकळू देत नाही.
12 अशक्तपणासाठी द्राक्षेपेक्षा चांगले औषध नाही. उलट्या आणि मळमळ झाल्यास द्राक्षांवर थोड मीठ आणि काळीमिरपूड घाला आणि सेवन करा.
13 पोटाची उष्णता कमी करण्यासाठी 20 -25 द्राक्ष रात्री पाण्यात भिजत घाला आणि सकाळी पिळून त्यातील रस काढा या रसात थोडी साखर घालून प्यावं.
14 जेवण्याच्या अर्धा तासांनंतर द्राक्षाचे रस प्यायल्याने रक्त वाढते आणि काहीच दिवसात पोट फुगी,अपचन,या आजारापासून मुक्ती मिळते.
15 हे एक शक्तिशाली आणि सौंदर्य वाढविणारे फळ आहे. या मध्ये आईच्या दुधा इतकेच पौष्टिक पदार्थ आढळतात.आरोग्याच्या बाबतीत द्राक्षाचे बरेच फायदे आहेत.