Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे

दुधात गूळ मिसळून पिण्याचे फायदे
, शनिवार, 22 जून 2019 (00:03 IST)
गूळ, चवीसह आरोग्यासाठी देखील खजिना आहे. हे खाण्याने केवळ तोंडाचा स्वादच बदलत नाही तर बर्‍याच रोगांशी देखील मुक्ती मिळते. आपल्यापैकी अनेकांनी आपल्या घरात वृद्धांना पाहिले असेल, की ते दुपारी किंवा रात्री जेवल्यानंतर तोंडात गुळाचा एक खडा तोंडात टाकून त्यावर पाणी प्यायचे. ते आपल्याला देखील गूळ खाण्याची सल्ला देत असतात. याचे कारण गुळामध्ये अनेक आरोग्य लाभ आहे. नियमितपणे गूळ खाल्ल्याने मासिक पाळी, गुडघे दुखणे आणि अस्थमा पासून आराम मिळतो. ज्या दिवशी आपण खूप थकलेले असता त्या दिवशी पाण्याबरोबर गुळाचा सेवन करा आणि त्याचा प्रभाव बघा. त्याचप्रमाणे दुधाबरोबर गूळ खाण्याने भरपूर लाभ होतो.
 
* दुधात गूळ मिळवून पिण्याचे फायदे :-
 
1. रक्ताचे शुद्धीकरण - गूळ रक्ताला शुद्ध करतो. त्याला दररोज आपल्या आहारात सामील करा.
 
2. पोट ठीक ठेवणे - पचन संबंधित सर्व समस्यांना गूळ खाऊन दूर करू शकता.
 
3. गुडघ्यांचा त्रास कमी होतो - गूळ खाल्ल्याने गुडघे दुखीचा त्रास कमी होतो. दररोज अदरकचा एक लहान तुकड्या बरोबर गूळ मिसळून खाल्ल्याने गुडघे मजबूत होतात आणि दुखणे दूर होते.
 
4. सौंदर्य सुशोभित करणे - गूळ खाल्ल्यामुळे त्वचा कोमल आणि निरोगी बनते. केस देखील चांगले होतात. त्याच बरोबर मुरूम देखील बरे होतात.
 
5. पीरियड्सच्या वेदनेत आराम - ज्या स्त्रियांना पीरियड्स वेदनादायक असतात, त्यांनी गूळ नक्कीच खायला पाहिजे. पीरियड्स प्रारंभ होण्याच्या एक आठवड्या आधीपासून दररोज 1 चमचा गुळाचे सेवन करायला पाहिजे.  
 
6. गर्भावस्थेत ऍनिमिया होत नाही - गर्भवती महिलांना दररोज गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे त्यांना अशक्तपणा येणार नाही आणि ऍनिमिया देखील होणार नाही. ऍनिमियामुळे स्त्रिया लवकर थकतात आणि त्यांना अशक्तपणा जाणवतो.
 
7. स्नायू मजबूत करण्यासाठी - दररोज एका ग्लास दुधात थोडे गूळ मिसळून प्यायल्याने नक्कीच फायदा होतो.
 
8. थकवा दूर करण्यासाठी - दिवसातून तीन वेळा तीन चमचे गूळ दररोज खायला पाहिजे.
 
9. दम्यासाठी - जर आपल्याला दम्याचा त्रास असेल तर घरी गूळ आणि काळ्या तिळाचे लाडू बनवून खा आणि त्यानंतर एक ग्लास दूध घ्या.
 
10. लठ्ठपणा वाढत नाही - जर साखराऐवजी दूध किंवा चहामध्ये गूळ घातला तर लठ्ठपणा वाढत नाही कारण साखर वापरल्याने आपण लठ्ठ होण्याची शक्यता असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योगा करताना कोणते कपडे घालावेत