Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'तो' त्रास पुन्हा नको...

'तो' त्रास पुन्हा नको...
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर धूम्रपान सोडायला हवं. सध्या काही महिलाही धुम्रपान करतात. हे लक्षात घेता हा सल्ला महत्त्वाचा ठरतो. 
 
* ट्रान्स फॅट आणि स्निग्ध पदार्थ वर्ज्य करा. तूप, तेलाचा आहारात नाममात्र वापर करा. चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनाने कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं आणि हृदयाला नीट रक्तपुरवठा होत नाही. 
 
* शर्करायुक्त पदार्थ, पेस्ट्री, केक असे पदार्थ कटाक्षाने टाळा. या पदार्थांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. 
 
* जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार दिवसाला 1500 मिलीग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणार्‍यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बरीच जास्त असते. त्यामुळे आहारात मीठाचं प्रमाण कमी ठेवा. 
 
* चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ टाळा. 
 
* हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पलंगावर पडून राहू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हालचाल करा. हलका व्यायामही करता येईल. 
 
* हृदयविकाराचा झटका आल्यानंतर आपल्या आरोग्याकडे संपूर्ण लक्ष द्यायला हवं. वजन नियंत्रणात ठेवायला हवं. यासाठी खाण्या पिण्याच्या सवयी बदला. आरोग्यदायी आहार घ्या, फळं खा. 
 
* हृदयविकाराच्या झटक्यानंतर मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपोथायरोडिजम अशा विकारांकडे दुर्लक्ष करू नका. या विकारांवर उपचार घ्या. 
 
* उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ताणतणाव तसंच गरजेपेक्षा जास्त व्यायाम केल्यानं रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. 
 
* हृदयविकाराच्या झटक्यानंतर औषधोपचार सुरू असताना थकवा, छातीत दुखणं, घाम येणं अशा समस्या निर्माण होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केळीच्या सालीचे फायदे माहित आहे का?