कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी ह्या पदार्थांचे सेवन करा

मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (00:01 IST)
योग्य प्रकारे लाइफस्टाइल मॅनेज केल्यास कर्करोगाचा धोका कमी केला जाऊ शकतो. त्यासाठी आवश्यक आहे संतुलित आहार. आहार संतुलित करण्यासाठी सर्वात आधी आपल्या आहारात कच्च्या भाज्या आणि डेअरी प्रॉडक्ट्सचे प्रमाण वाढवावे. फळं आणि भाज्यांमध्ये आढळणारे फायबरने शरीरातील ऑइस्ट्रोजन हार्मोनचे प्रमाण कमी केले जाऊ शकतात. जे लोकं लो फेट डेअरी पदार्थ सेवन करतात त्यांना कर्करोग होण्याची कमी असते. याव्यतिरिक्त काही खास  पदार्थ सेवन केल्याने शरीराला कँसरशी लढण्याची शक्ती मिळेल.
लसूण कोणत्याही पदार्थात टाकण्याच्या 15 मिनिटे आधी सोलून ठेवावा. अशाने लसणात आढळणारे फायदेशीर एन्ज़ाइमचे उत्पादन जलद होते.
आहारात प्रत्येक प्रकाराची बेरीज सामील करा, यात फ्लेवनॉइड्स भरपूर मात्रेत आढळतं. स्ट्रॉबेरी, मलबेरी, जांभुळ, डाळिंब आणि टॉमेटो खावे. 
40 ते 45 वयाच्या स्त्रियांसाठी ब्लॅक टी आणि ग्रीन टी सर्वोत्तम पेय आहे.
 
जेवण्याच्या पदार्थांमध्ये मसाले वापरा. प्रत्येक मसाल्यात काही न काही गुण असतात. त्यातला त्यात हळद सर्वात फायदेशीर आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख भूक वाढविण्यासाठी हे करून बघा