Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Side Effects of Pineapple: अनानस खाल्यास घातक ठरू शकते अशा प्रकारची अॅलर्जी

Side Effects of Pineapple:  अनानस खाल्यास घातक ठरू शकते अशा प्रकारची अॅलर्जी
, मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (22:47 IST)
Pineapple किंवा अननस खाण्याचे अनेक फायदेआहेत. त्यात कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असतात. अननस देखील व्हिटॅमिन सी आणि फायबरचा एक चांगला स्रोत मानला जातो. हे वजन कमी करण्याबरोबरच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, परंतु अननस खाण्याच्या फायद्यांसह त्याचे काही दुष्परिणामदेखील आहेत.
 
खाज सुटणे आणि सूज येणे
काही लोकांना अननस खाल्ल्यावर खाज आणि सूज येण्याची समस्या असते. हे लेटेक्स अॅलर्जीमुळे होते. अननस naturalrubber latex चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. जर तुम्हाला आधीच माहीत असेल की तुम्हाला लेटेक्स अॅलर्जी आहे, तर अननस खाऊ नका.
 
अतिसार आणि उलट्या
अननसमध्ये असलेल्या ब्रोमेलेनमुळे अतिसार आणि उलट्या होऊ शकतात. असे लोक जे ब्रोमेलनसाठी सेंसिटिव असतात किंवा अननस मोठ्या प्रमाणात खातात, त्यांना ही समस्या येते.
 
तोंड आणि ओठ दुखणे
अननस मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने तोंड, जीभ आणि ओठांमध्ये टेंडरनेसची समस्या येते आणि वेदना होऊ शकते. ब्रोमेलेनमध्ये असे गुणधर्म आहेत, ज्यामुळे हे घडते. तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही शिजवलेले अननस खाल्ले तर ते तुम्हाला हे दुष्परिणाम कमी करण्यास मदत करतील. स्टेम आणि कोर जवळचा कच्चा अननस खाणे टाळा कारण त्यात ब्रोमेलेनचे प्रमाण जास्त असते.
 
ब्लीडिंग
Bromelain,Anti-coagulant  म्हणून देखील कार्य करते आणि म्हणूनच रक्त पातळ करून गुठळ्या तयार होऊ देत नाही. यामुळे भरपूर ब्लीडिंग होऊ शकतो.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shoe Bites नवीन चपला- जोडे चावतात ? तर खास आपल्यासाठी हे टिप्स