Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Health Tips :अशा लक्षणांचा अर्थ रक्त गोठणे,वेळीच सावधगिरी बाळगा

Health Tips :अशा लक्षणांचा अर्थ रक्त गोठणे,वेळीच सावधगिरी बाळगा
, मंगळवार, 3 मे 2022 (21:25 IST)
आपल्या शरीराची प्रणाली अशा प्रकारे तयार केली गेली आहे की ती सहसा स्वतःहून लहान समस्यांचे निराकरण करते. दुखापत किंवा जखम झाल्यानंतर काही वेळाने रक्तस्त्राव स्वतःहून थांबतो, त्यामागे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेचा हातभार असल्याचे मानले जाते. रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यामुळे रक्तस्त्राव थांबतो, परंतु जेव्हा शरीरात अनावश्यक गुठळ्या तयार होऊ लागतात,तेव्हा ही स्थिती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक आणि धोकादायक मानली जाते. जर रक्ताच्या गुठळ्यांची संख्या वाढत असेल तर काही परिस्थितींमध्ये यामुळे जीवघेणी समस्या उद्भवू शकते. 
 
रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठण्याच्या समस्येमुळे, अवयवांना पुरेसे रक्त मिळत नाही, ज्यामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आरोग्य तज्ञांच्या मते, सर्व लोकांनी त्याच्या लक्षणांबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे, जेणेकरून कोणतीही गंभीर समस्या अगोदरच ओळखली जाऊ शकते आणि वेळेवर उपचार केले जाऊ शकतात.
 
आरोग्य तज्ञांच्या मते, शरीरात रक्त गोठण्याच्या स्थितीत काही लक्षणे दिसू लागतात, ज्याबद्दल सर्व लोकांना माहिती असणे आवश्यक आहे. अशा लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन, गंभीर समस्यांचा धोका कमी केला जाऊ शकतो. या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.
 
1 सूज येणे आणि त्वचेचा रंग बदलणे-
 हात किंवा पायांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. या स्थितीत वेदना होणे, सूज येणे आणि त्वचेचा लाल-निळा रंग असू शकतो. या प्रकारच्या समस्येचा धोका पायांमध्ये जास्त असतो. तज्ज्ञांच्या मते, विशेषत: दुखापतीनंतर त्वचेवर लालसरपणा किंवा निळा रंग बराच काळ दिसत असेल, तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे रक्त गोठण्याचे लक्षण मानले जाऊ शकते.
 
2 श्वास घेण्यात त्रास होणे-
 रक्त गोठल्यामुळे, ऑक्सिजन समृद्ध रक्त प्रवाह प्रभावित होऊ शकतो, ज्यामुळे एखाद्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तुम्हालाही काही काळापासून अस्पष्ट कारणांमुळे श्वसनाचा त्रास होत असेल तर याबाबत डॉक्टरांशी जरूर संपर्क साधा.
फुफ्फुसात तयार होणार्‍या रक्ताच्या गुठळ्या श्वासोच्छवासास त्रास देऊ शकतात, जर वेळीच काळजी घेतली नाही तर गंभीर प्रकरणांमध्ये जीवघेणा समस्या देखील उद्भवू शकतात.
 
रक्ताच्या गुठळ्यांच्या या लक्षणांबद्दल जाणून घ्या-
रक्ताच्या गुठळ्या शरीराच्या कोणत्या भागात आहे त्यानुसार रक्ताच्या गुठळ्या होण्याची लक्षणे भिन्न असू शकतात. सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देऊन, परिस्थितीला गंभीर स्वरूप घेण्यापासून वाचवता येते.हे काही लक्षणे आहेत. 
* ओटीपोटात रक्ताच्या गुठळ्या होणं - पोटदुखी, मळमळ आणि उलट्या.
* फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या होणं - श्वास लागणे, खोल श्वास घेताना वेदना होणं  आणि हृदय गती वाढणे.
* मेंदूमध्ये  रक्ताच्या गुठळ्या होणं - बोलण्यात अडचण होणं, दृष्टी समस्या होणे, चक्कर येणे, शरीर पक्षाघात किंवा डोकेदुखी.
* हृदयात रक्ताच्या गुठळ्या होणं - छातीत दुखणे, भरपूर घाम येणे, धाप लागणे, डाव्या हातामध्ये वेदना होणं.
 
रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून काही उपाय -
दिनचर्या आणि आहाराकडे लक्ष दिल्यास रक्ताच्या गुठळ्या होण्यासारख्या समस्या टाळता येऊ शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे . यासाठी सर्वात आधी एकाच जागी जास्त वेळ बसण्याची सवय सोडा. वेळोवेळी फिरणे खूप आवश्यक आहे.
 
नियमित शारीरिक हालचाली, व्यायाम-योगाची सवय लावा. धूम्रपानासारख्या सवयी टाळा, ज्यामुळे समस्यावाढू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, निरोगी वजनाकडे विशेष लक्ष द्या, ज्यांचे वजन जास्त आहे त्यांच्यामध्ये रक्त गोठण्याचा धोका वाढतो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career Tips : चांगले करिअर करायचे असल्यास नियोजन करणे आवश्यक आहे, या 7 टिप्स फॉलो करा