चयापचयक्रियेचा वेग वाढवण्यासाठी...

सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (16:38 IST)
वजन कमी करण्यासाठी प्रथिनयुक्त आहार घेण्यावर भर दिला जातो. प्रथिनांमुळे पोट बराच काळपर्यंत भरलेले राहते आणि आपण कमी खातो. प्रथिनांमुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो. मात्र नियमित व्यायाम करणेही गरजेचे आहे.
* कॉफीमुळेही चयापचय क्रियेचा वेग वाढतो. एकापेक्षा अधिक कप कॉफी पिणार्‍यांचे वजन वेगाने कमी झाल्याचे काही संशोधनांमधून सिद्ध झाले आहे. मात्र, कॉफीचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.
* डाळी, कडधान्यांमधून भरपूर प्रथिने मिळतात. यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. चयापचय क्रियेचा वेगही वाढतो.
* अ‍ॅपल सिडर व्हिनेगार खूपच उपयुक्त पदार्थ आहे. याच्या सेवनाने वजनवाढीला मदत मिळते. तसेच या व्हिनेगारचे इतरही लाभ आहेत. पाण्याच्या ग्लासमध्ये दोन चमचे अ‍ॅपल सिडर व्हिनेगार घालून पिता येईल. यामुळे चयापचय क्रियेचा वेगही वाढतो.
* वजन कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवे. पाण्यामुळे चयापचय क्रियेचा वेगही वाढतो. त्यामुळे दिवसभरात दोन ते अडीच लीटर पाणी प्यायला हवे.
 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख अशी घ्या सोन्याच्या दागिन्यांची काळजी