कोरोना व्हायरस किंवा विषाणू पूर्वी घशात आणि फुफ्फुसांमध्ये संसर्ग पसरवीत होता पण आता काही तासातच रुग्णाच्या शरीरात पोटॅशियमचे प्रमाण वाढवल्याने धोका वाढत आहे. परिणामी मूत्रपिंड आणि हृदय निकामी होत आहे.
कोव्हिड -19 ची लागण लागलेल्या रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की संसर्गाची धोकादायक स्थिती होऊ लागली आहे. रक्तात पोटॅशियमचे असामान्य प्रमाण झाल्यास हायपरक्लेमिया होत आहे.
मूत्रपिंड निकामी करणारा हा विषाणू
तज्ज्ञ सांगतात की पोटॅशियम हे स्नायूंचा आकुंचनासाठी आणि अनेक जटिल प्रथिनांच्या कार्यासाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. हे सोडियमसह शरीरातील द्रव्य आणि शरीरातील पेशी यांच्यात सामान्य प्रवाह निर्माण करण्यात मदत करतं. शरीरातील पोटॅशियमला किडनीद्वारे नियंत्रित केलं जातं. कोरोना विषाणू किडनीवर हल्ला करून पोटॅशियमचे प्रमाण वाढवून देतं ज्यामुळे किडनी निकामी होण्याचे प्रमाण वाढते. या मुळे पोटॅशियम पेशींमधून रक्तात मिसळतं आणि त्याची संपूर्ण शरीरात वाढ होते.
सावधगिरी
प्रत्येकाने पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तज्ज्ञ सांगतात की पोटॅशियमच्या अधिकतेमुळे हृदय आकुंचन पावतो. कोरोनाच्या रुग्णाच्या बाबतीत डॉक्टर काही करतील तो पर्यंत वेळ निघालेली असते. धोका वाढून जातो. म्हणून महत्त्वाचे आहे की रुग्णांनी वेळेवर रुग्णालयात पोहोचणे, त्यानंतर औषधोपचाराने हे नियंत्रित केले जाऊ शकते. कोरोनामुळे हे कोणाच्या लक्षात येत नाही अशात रूग्णाचं नव्हे तर सामान्य लोकांनी देखील पुरेसे पाण्याचे सेवन करावे.
ही आहेत लक्षणे -
मळमळ होणं,
अशक्तपणा,
बेशुद्ध होणं,
स्नायूंमध्ये मुंग्या येणं,
आखडणे.
पल्सरेट मंद होणं,
हृदयाची गती मंदावणे.
यापैकी लक्षण असल्यास केळी, शेंगदाणे, दूध आणि बटाट्याचे सेवन करणे टाळावे.