Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बद्धकोष्ठता व त्यावरील सोपे घरगुती उपाय

बद्धकोष्ठता व त्यावरील सोपे घरगुती उपाय
, सोमवार, 15 जून 2020 (12:15 IST)
अनियमित दैनंदिनी क्रम आणि खाण्याच्या सवयीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होणे ही एक साधारण बाब आहे. जेवण्यानंतर बसून राहणे आणि रात्रीच्या जेवण्यानंतर सरळ झोपणे. या सारख्या सवयी बद्धकोष्ठतेसाठी जवाबदार आहेत. जर आपणास देखील हा त्रास होतो तर आम्ही आपल्याला सांगत आहोत या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी 10 घरगुती उपाय.....
 
1 सकाळी उठल्यावर पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि काळं मीठ टाकून प्या. असे केल्याने पोट स्वच्छ होईलच त्याच बरोबर बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होईल. 

2 बद्धकोष्ठतेसाठी मध खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मध मिसळून प्या. ह्याचा नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो.

3 सकाळी उठल्यावर दररोज अनोश्यापोटी 4 ते 5 काजू, तेवढेच मनुके बरोबर खाल्ल्यानेही बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. याव्यतिरिक्त रात्री झोपण्याआधी 6 ते 7 मनुके खाल्ल्याने आराम मिळतो.

4 दररोज रात्री हरड किंवा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्याबरोबर प्यावे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो, त्याच बरोबर पोटामध्ये गॅस तयार होत नाही.

5 बद्धकोष्ठतेवर उपचार म्हणून झोपताना एरंडेल तेल कोमट दुधामध्ये मिसळून पिऊ शकता. ह्याने पोट तर साफ होतेच. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

6 इसबगोलची भूशी बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय आहे. आपण ह्याला रात्री झोपताना पाण्याबरोबर किंवा दुधाबरोबर देखील घेऊ शकता. 

7 फळांमधील पेरू आणि पपई बद्धकोष्ठतेसाठी खूप फायदेशीर आहे. ह्याचे सेवन आपण कधीही करू शकता. हे खाल्ल्याने पोटाचा त्रास तर दूर होतोच, त्वचा देखील सुंदर होते.

8 बेदाणे काही वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. या व्यतिरिक्त अंजीर रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो.

9 पालक देखील बद्धकोष्ठतेच्या त्रासासाठी एक चांगला पर्याय आहे. दररोज पालकाच्या रसाला आपल्या दैनंदिनी मध्ये घेऊन बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवू शकता, त्याच बरोबर पालकाची भाजी देखील आरोग्यासाठी चांगली असते. पण जर आपल्याला स्टोनचा त्रास असल्यास पालक सेवन करणे टाळावे. 

10 बद्धकोष्ठता टाळण्यासाठी नियमाने व्यायाम आणि योग करणे फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त नेहमी गरिष्ठ आहाराचे सेवन करणे टाळावे. 
या व्यतिरिक्त बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त असल्यास वैद्यकीय सल्ला जरूर घेणे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हातावर सॅनिटायझरचा अधिक वापर हानिकारक