Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चुकून हे करू नये नाहीतर विषारी होईल मध

चुकून हे करू नये नाहीतर विषारी होईल मध
मध अमृतासमान मानले आहे आणि आरोग्य दृष्ट्याही लाभदायक असतं. योग्यरीत्या याचे सेवन आरोग्यासाठी उचित तर अयोग्यरीत्या सेवन केल्यास हे विषासमान आहे. आयुर्वेदात याला अमृततुल्य मानले आहे परंतू काही प्रकारांवर रोख लावली आहे.
 
नेहमी शुद्ध मधाचे सेवन केले पाहिजे. याने सुंदरता वाढते. परंतू हेच मध कधी विषाप्रमाणे काम करतं हे जाणून घ्या:
मध कधीही गरम खाद्य पदार्थांसोबत खाऊ नये.
कधी चहा, कॉफीमध्ये साखरेऐवजी मध वापरू नये. याने नुकसान होतं.
आंबट फळं, द्राक्ष, अमरूद किंवा साठा या सोबत मध घेण्याने लाभ मिळतो.
कधीही मधाला आचेवर शिजवू नये.
मास, मासोळ्यांसोबत मधाचे सेवन विषाप्रमाणे आहे.
मधात तूप आणि दूध सममात्रेत हानिकारक आहे.
साखरेसोबत मध मिसळणे अमृतात विष कळवण्यासारखे आहे.
एकाच वेळी अधिक मात्रेत मध सेवन करणे नुकसानदायक असतं. दिवसातून दोन किंवा तीनदा एक चमचा मध घेणे योग्य ठरेल.
तेल किंवा लोणीत मध विष बनून जातं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिवाळ्यात कशी घ्याल स्वेटर-मफलरची काळजी?